अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात वॉरंट, ड्रेस डिझायनरला मारहाण केल्याचं प्रकरण

अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात वॉरंट, ड्रेस डिझायनरला मारहाण केल्याचं प्रकरण

प्राजक्ता माळीने मारहाण केल्याचा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिनं केला होता. ठोशाबुक्क्याने मारहाण केली असंही तक्रारीत म्हटलं होतं.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 18 नोव्हेंबर : अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. तसच वारंवार कोर्टातील सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल ठाणे दंडाधिकारी कोर्टाने तिला 1 हजार रुपयांचा दंड सुनावलाय. मालिकेच्या सेटवर आपल्याच ड्रेस डिझायनर मारहाण प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. आपल्याला अभिनेत्री प्राजक्ता माळीने मारहाण केल्याचा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिनं केला होता. माळी हिच्याविरोधात 5 एप्रिल रोजी काशिमीरा पोलिस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली होती. ठोशाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप मनचंदा हिने केला होता. त्यानंतर मनचंदाने माळी हिच्याविरुद्ध ठाणे न्यायालयात धाव घेत तक्रार केली होती. न्यायालयाने तक्रार दाखल करून घेतली. शिवाय धमकीचे 506 कलमही न्यायालयाने वाढविल्याने माळी हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली होती.

Good Newwz ने उडवली अक्षय-करिनाची झोप, पाहा Trailer

न्यायालयाने समन्स बजावत न्यायालयात सुनावणीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले होते. समन्स घेऊन पोलीस माळी हिच्या घरी देखील गेले होते. मात्र घरी कोणीच नसल्याने समन्स परत आले. न्यायाधीश व्ही. व्ही. राव जडेजा यांच्या न्यायालयात सुनावणी होती त्याही वेळेस प्राजक्ता माळी गैरहजर राहिली त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही.

वारंवार सुनावणीस गैरहजर राहत असल्याने प्राजक्ता माळी विरोधात अटक वॉरंट काढावे अशी मागणी तक्रारदारांनी केली होती मात्र प्राजक्ता माळीला सुनावणीस हजर राहण्याकरता आणखी एक संधी देत न्यायालयाने पुढील सुनावणी म्हणजेच आज सुनावणी ठेवली होती मात्र आजही प्राजक्ता माळी गैरहजर राहिल्याने संताप व्यक्त करत न्यायालयाने प्राजक्ता माळी विरोधात जामिनपात्र अटक वारंट जारी केले होते.

'लाल सिंग चढ्ढा'चा First Look रिलीज, मजेदार अंदाजात दिसला आमिर खान

त्याचबरोबर एक हजार रुपयांचा दंड देखील न्यायालयाने प्राजक्ता माळीला ठोठावला होता. न्यायालयाच्या या दणक्यानंतर या प्रकरणी आज ठाणे न्यायालयात प्राजक्ता माळी तर्फे न्यायालयात त्यांचे वकील हजर झाले होते. 13 डिसेंबर ला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

प्राजक्ता माळीकडून स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणानंतर प्राजक्ता माळीच्या वकिलानी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी हीच्या विरुद्धखोटी खाजगी फिर्याद दाखल केली होती. सदर केसचे समन्स आम्हांस कधींही मिळाले नाही. जुलैमध्ये ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने केस ला स्थगिती (stay order) दिली. सदर केसची सुनावणी स्टे असताना, फिर्यादी आणि त्यांच्या वकिलांनी खोटी माहिती देऊन आमच्या आशिलाची जाणीवपूर्वक बदनामी केलेही आहे. कायद्यनुसार सत्र न्यायालयात आव्हान दिले असताना कनिष्ट न्यायालय पुढील आदेश येईपर्यंत कुठलीही गोष्ट करु शकत नाहीत. परंतू, या आधी ही समन्स बजावले नसतानाही खोटी माहिती देऊन त्या वेळी त्यांनी आमच्या प्राजक्ता माळींची सर्वत्र बदनामी केली आहे.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: November 18, 2019, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading