Home /News /mumbai /

मुंबईमध्ये इंग्रजीचा शिक्षक आला रस्त्यावर, लॉकडाऊनमुळे बस स्टॉपलाच बनवलं घर

मुंबईमध्ये इंग्रजीचा शिक्षक आला रस्त्यावर, लॉकडाऊनमुळे बस स्टॉपलाच बनवलं घर

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या प्रोफेसरसाठी बसस्टॉप हेच आता घर झालं आहे.

मुंबई, 11 मे : कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण आपल्या घरापासून दूर अडकून पडले. या अडकलेल्या लोकांचे मोठे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील एक प्राध्यापकही याला अपवाद ठरले नाहीत. लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या प्रोफेसरसाठी बसस्टॉप हेच आता घर झालं आहे. सार्वजनिक शौचालयात जायला किंवा अगदी अंगावरचे कपडे धुवायलाही या प्राध्यापकाकडे पैसे उरले नाहीत. अमित बंगाली असं या प्राध्यापकाचं नाव आहे. अमित बंगाली हे ठाण्याच्या एका  ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात आणि तेही इंग्रजीचे. अमित हे लॉकडाऊनच्या त्या दिवशी परत जाण्यासाठी म्हणून एसटी डेपोच्या बाहेर आले आणि तेव्हापासून आतापर्यंत एसटी डेपो बाहेरचा बस स्टॉप हाच त्यांचा पत्ता झाला आहे. मोबाईल आणि पैसे असं सगळं चोरी गेल्यानंतर आता अमितकडे आजुबाजूच्या लोकांनी दिलेल अन्न खाणं इतकाच पर्याय आहे. राज्य सरकार मोफत एसटी गाड्या चालवत आहे, पण या गाड्यांमध्ये मात्र मजूर नसलेल्या अमित सारख्या अनेकांना जाण्याची मुभा नाही. अमितसारख्या अनेकांनी फूटपाथचा आणि बस स्टॉपचा सहारा घेतला आहे. त्याच्या पैकीच एक म्हणजे भारतीय आर्मीमधून रिटायर झालेला एक जवानही मुंबईत अडकला आहे. दीपक लिंबू हा जवान त्या दिवशी मुंबई सेंटरला पोहोचला. तेव्हापासून आजतागायत त्याचं फुटपाथ हेची घरं असं काहीसं झालं आहे. आर्मीमध्ये कार्यरत असलेले दीपक लिंबू सेवानिवृत्तीनंतर मुंबईत कामाच्या शोधात आले. एका भूक लागलेल्या मुलाला त्यांनी पैसे काही दिले. मात्र त्याच मुलांना त्यांच्याजवळचे 17 ते 18 हजार रुपयांसह अनेक गोष्टी पळवून नेल्या. त्यामुळे दीपक लिंबू मात्र अडकून पडले ते मुंबई सेंट्रलच्या बस स्टॉपवर. अमित आणि दीपक यांच्या उदाहरणातून लॉकडाऊनची एक भयकथा समोर आली आहे. सरकारकडून मजुरांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी मदत केली जात आहे. मात्र आता सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकत अशा अडकलेल्या इतर लोकांनाही मदत करण्याची आवश्यकता आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या