खड्डा चुकवायला गेला आणि ट्रक खाली आला, दोन दिवसात दुसरा बळी

खड्डा चुकवायला गेला आणि ट्रक खाली आला, दोन दिवसात दुसरा बळी

खोल खड्ड्यात गाडी जावू नये म्हणून ट्रकचालकाने ट्रक थोडा बाजूला घेताच त्यातच हा अपघात झाला.

  • Share this:

ठाणे 11 ऑक्टोंबर : खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये दररोज वाढ होतेय. वाडा भिवंडी रोडवर शुक्रवारी पुन्हा भीषण अपघात झाला. खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने एका 60 वर्षाच्या नागरिकाला उडवलं. कुडूस इथं ही घटना घडली. या अपघातात नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. रामप्रसाद गोस्वामी असं त्या नागरिकाचं नाव आहे. रामप्रसाद हे मुसारणे येथील एका कंपनीत वॉचमन म्हणून कार्यरत होते. रस्त्यात खड्डे असल्याने ते चुकवत चालत होते. त्यातच खोल खड्ड्यात गाडी जावू नये म्हणून ट्रकचालकाने ट्रक थोडा बाजूला घेताच त्यातच हा अपघात झाला.

भिवंडी-वाडा मार्गावर पुन्हा अपघात, वाटसरूच्या हात आणि पायावरून गेला टेम्पो

अन्य एका घटनेत भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे डॉक्टर असणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय तरुणीची बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार ताजा असतानाच रस्त्यांमुळे आणखी एका महिलेला जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे.भरधाव कंटेनरमुळे घोडबंदरवर पुन्हा एक बळी गेला आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा इथे हा अपघात झाला असून या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. भाईंदर पाडा इथून ही महिला आपल्या पती सोबत दुचाकीवरुन जात असताना गाडीला अपघात झाला आणि यात महिलेने जागीच आपला जीव गमावला आहे.

महिला दुचाकीवरून जात असताना अचानक मागून भरधाव वेगाने एक कंटेनर आला. याच वेळेस गाडीवर बसलेल्या महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली आणि तिझ्या अंगावर तो भरधाव वेगाने कंटेनर गेला. ज्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये महिलेचा पती आणि लहान मुलगी बचावली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी चीनच्या अध्यक्षांना दिलेलं 'गिफ्ट' पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीव जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारीच भिवंडीमध्ये एका भीषण अपघातात अवघ्या 23 वर्षाच्या तरुणीने जीव गमावला आहे. लग्नाची स्वप्न रंगवणाऱ्या आणि लोकांना जीवदान देणाऱ्या डॉ. तरुणीवरच काळानं घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांनी डॉक्टर असणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय तरुणीची आयुष्य़ाची स्वप्न उद्ध्वस्त केली. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे तरुणीचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 12, 2019, 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading