आज ठाण्यात रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन, या आहेत मागण्या

आज ठाण्यात रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन, या आहेत मागण्या

आज ठाण्यात जवळपास 2 हजार रिक्षाचालक धरणे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना त्रास होऊ शकतो.

  • Share this:

ठाणे, 13 जुलै : आज ठाण्यात जवळपास 2 हजार रिक्षाचालक धरणे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना त्रास होऊ शकतो. एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना यांनी हे धरणे आंदोलन पुकारलं आहे. आज सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे केले जाणार आहे.

या धरणे आंदोलनात जवळपास 2000 रिक्षा चालक सहभागी होणार आहे. यात 6 मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केलं जाणार आहे. खरंतर अनेक रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी होणार असल्याने यात प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे. ठाण्यात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आज जरा वेळेआधी घराबाहेर निघावं आणि कामावर पोहण्यासाठी इतर वाहनांचा वापर करावा.

VIDEO : जखमी तरुणांची जगण्यासाठी याचना पण लोकं सेल्फी काढत होते !

दरम्यान, या 6 मागण्यांसाठी रिक्षाचालक धरणे आंदोलन करणार आहे.

१) मुक्त रिक्षा परवाने बंद करा

२) रिक्षा पासिंग ठाणे आरटीओतून मध्येच करावे

३) महागाई नुसार रिक्षाचे भाडे दरवाढ करावी

४) सीएनजी गॅस पासिंग करता ३ हजार रुपये लागतात ते कमी करावे

५) राज्य शासनाने रिक्षा कल्याण कारी मंडळ स्थापन केलय त्याच्या

सुविधा मिळाव्यात

६) या कल्याणकारी योजनेतर्गंत ५ कोटी रुपये मंजूर केलेत त्याचे काय झाले? त्यात ज्या सुविधा आहेत त्या रिक्षावाल्यांना मिळाव्यात

हेही वाचा...

VIDEO : पुणे तिथे काय उणे,अख्खा बंगला जॅक लावून 4 फूट उचलला

पोलिसांनी साजरा केला 3 मुलींच्या बलात्काराचा आनंद, गावाला मटनाची दावत

माणुसकीला काळिमा, ओळखीच्याच इसमाने साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर केला लैंगिक अत्याचार

First published: July 12, 2018, 7:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading