ठाण्यातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर, 12 जण जखमी

ठाण्यातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर, 12 जण जखमी

ठाण्याच्या सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर झाल्यानं 12 प्रवासी जखमी झाले. बसमध्ये एकूण 28 प्रवासी होते.

  • Share this:

ठाणे, 21 जून : ठाण्यात पश्चिमेला सॅटिस उड्डाण पुलावर दोन बसची जोरदार टक्कर झालीये या मध्ये २८ प्रवासी होते त्यापैकी १२ प्रवासी जखमी झालेत त्यांना सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ठाणे स्टेशन ते टेंभा नाका दिशेने ठाणे शहापूर बसची स्टेंअरिंग अचानक लाॅक झाल्याने ड्रायव्हरने उड्डाणपुलावरच बस थांबवली. अचानक समोर बस थांबली त्यामुळे मागून येणारी ठाणे भिवंडी बसने उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली.  यामुळे दोन्ही बसेसचं नुकसान झालंय.

हेही वाचा

मंत्रालयात कर्मचाऱ्यांचं योग दिवसाकडे 'पाठा'सन

जर ठेवायचे असतील दूर रोग, तर दररोज करा योग - रामदास आठवले

अमृता खानविलकर-सोनाली खरेचा 'पार्टनर योग'

VIDEO सिरोंजला जाणाऱ्या विमानात चढला भिकारी आणि...!

ठाणे शहरातील सॅटिस पुलावर ही घटना घडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळच एसटी बस स्टँड आहे. या बस स्टँडहून ठाणे-भिवंडी, ठाणे-शहापूर, ठाणे-वाडा, ठाणे-पनवेल अशा बसेस सुटतात. या सगळ्या बसेस सॅटिस पुलावरूनच जातात. सॅटिस पुलावर टीएमटी अर्थात ठाणे महापालिकेच्या बसेसचीही गर्दी असते.

 

First published: June 21, 2018, 3:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading