Home /News /mumbai /

Video : शिवसेनेतील बंडखोरीमुळे संयम सुटला? ठाकरे सुपूत्राची थेट पंतप्रधानांवर टोकाची टीका 

Video : शिवसेनेतील बंडखोरीमुळे संयम सुटला? ठाकरे सुपूत्राची थेट पंतप्रधानांवर टोकाची टीका 

या आधी आदित्य ठाकरेंनीही बंडखोर आमदारांवर वाईट शब्दात टीका केली होती.

    मुंबई, 27 जून : बंडखोर आमदारांची मनधरणी केली तरीही ते काही ऐकण्याचा मानसिकतेत नसल्याचं कळताच ठाकरे कुटुंब आक्रमक झालं आहे. आदित्य ठाकरे आक्रमक झाले असून विविध ठिकाणी सभा घेऊन बंडखोर आमदारांवर टीका करीत आहेत. आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवरही टोकाची टीका केली आहे. दरम्यान आज माध्यमांशी बोलताना देशात हिटरलशाही आहे का? आपल्या देशात लोकशाही उरली आहे का? असं म्हणत आता जगाला याचं उत्तर द्यावं लागेल, असंही म्हणाले. शिवसेना फुटल्यामुळे आधीच ठाकरे सरकारवरील संकट वाढलं आहे. आदित्य ठाकरे आक्रमक... 'त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येणं नाही' हिंमत असेल तर राजीनामा पाठवा आणि निवडणुकीला सामोरे जा. आम्ही तयार आहोत. मला माहिती आहे इथे जे उभे आहेत ते आज प्रचाराला त्यांना बाहेर पडू देणार नाहीत. तिथे काही आमदार बसले आहेत जे आपल्या संपर्कात आहेत. त्यांना आपण परत घेऊ शकतो. ज्यांनी बंड केलाय, दगा दिलाय त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येणं नाही, हे आपण शपथ घेऊन पुढे चाललं पाहिजे", असा एल्गार आदित्य ठाकरेंनी केला. फ्लोर टेस्टट तर होणारच आहे. ज्या दिवशी फ्लोर टेस्ट होईल त्यादिवशी मुंबईत उतरतील. विमानतळावरुन विधानभवनात जाण्याचे रस्ते आपल्या वरळीतून आहेत. वरळी नाहीतर आपल्या परळमधून आहेत. येणार आमच्या वांद्र्यामधून. ही मुंबई आपली आहे. ती दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. कदाचित त्या फ्लोर टेस्टसाठी केंद्र सरकार आर्मी लावू शकतील", असं आदित्या ठाकरे म्हणाले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Modi government, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या