शपथविधी सोहळ्यानंतर ठाकरे सरकारची पहिली कॅबिनेट बैठक, घेणार मोठा निर्णय?

शपथविधी सोहळ्यानंतर ठाकरे सरकारची पहिली कॅबिनेट बैठक, घेणार मोठा निर्णय?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर आज रात्रीची कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मुंबईतील शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन नेते शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

या शपथविधी सोहळ्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांबद्दल मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री हजर राहणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी किमान समान कार्यक्रम घोषित केला. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्याने त्यांनी तीनही पक्षांच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे एकत्र करत हा किमान समान कार्यक्रम तयार केला आहे.

उद्धव ठाकरे सरकारचा तो मुख्य अजेंडा राहणार असून सर्वांच्या विकासासाठी हे सरकार काम करेल, असंही या नेत्यांनी सांगितलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, सर्व जाती धर्म आणि प्रादेशिक विभाग, SC, ST, OBC धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं.

Published by: sachin Salve
First published: November 28, 2019, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading