पुणे, 1 जानेवारी : देशभरातील जेलमध्ये (Jail) मोठ्या संख्येने कैदी राहत आहेत. महाराष्ट्रातील तुरूंगातही अशीच परिस्थिती आहे. राज्यातील कारागृहांची 22 हजार कैद्यांची क्षमता आहे, परंतू अशातही 38 हजार कैदी येथे राहत आहेत. अशा परिस्थितीत कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी आधुनिक कारागृह बांधण्याचा विचार सुरू असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पाहणी केल्यानंतर देशमुख म्हणाले की, तुरूंग प्रशासनाने महाराष्ट्राच्या तुरूंगात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरवू दिलं नाही, हे कौतुकास्पद काम आहे. ते म्हणाले, "कोविड - 19 महासाथीदरम्यान मी तुरूंगातील अधिकारी आणि कर्मचार्यांची भेट घेतली. आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले." मी कैद्यांचीही भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या ऐकल्या. '
16 हजार अधिक कैदी
देशमुखांनी हे मान्य केलं की सद्यस्थितीत राज्यातील सर्व तुरुंगात ठराविक संख्येपेक्षा जास्त कैदी आहेत. याची संख्या कमी करण्यासाठी आधुनिक तुरुंगांच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. राज्यात तुरुंगाची क्षमता 22000 कैद्यांची आहे, मात्र तेथे तब्बल 38000 कैदी राहतात.
तात्पुरत्या पॅरोलवर 11000 जणांना सोडण्यात आलं
महाराष्ट्राचे गृहमंत्री पुढे म्हणाले की, कोरोना कालावधीत आम्ही तात्पुरत्या पॅरोलवर सुमारे 11,000 कैद्यांची सुटका केली आहे. यामुळे आम्हाला कोरोना विषाणूदरम्यान सुरक्षित राहण्यास मदत झाली. तुरुंगात कैद्यांना या विषाणूची लागण होण्याचे प्रकार घडले असले तरी सर्व कैद्यांना योग्य उपचार देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.