मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, आरोग्य विभागात 2226 पदांची जम्बो भरती!

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, आरोग्य विभागात 2226 पदांची जम्बो भरती!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

सार्वजनिक आरोग्य विभागाअंर्तगत ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 जून: कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. राज्य सरकारने (MVA Government) कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. आरोग्य विभागात (health department) जम्बो भरतीचा (jumbo recruitment of 2226 posts) निर्णय अखेर जाहीर करण्यात आला असून तब्बल 2226 पद भरली जाणार आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य विभागात लवकरच जम्बो भरती केली जाईल अशी माहिती दिली होती. अखेर, राज्य सरकारने याबद्दल आदेश काढला आहे.  आरोग्य विभागात एकूण 2226 पदांची जम्बो भरती होणार आहे.

महात्मा गांधींच्या पणतीला 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, 62 लाखाच्या फसवणुकीचा आरोप

सार्वजनिक आरोग्य विभागाअंर्तगत ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर आरोग्य संस्थांचे 75 टक्के बांधकाम पुर्ण झालेले आहे. तसेच अनुक्रमांक 12 आणि 15 येथील शासन निर्णयान्वये  उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय ट्रामा केअर युनिट  इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर राज्यातील बांधकाम पुर्ण झालेल्या एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता एकूण 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 कुशल मनुष्यबळ सेवा उपलब्ध करुन घेण्यास निर्माण करण्यास आणि  आरोग्य संस्थांचे कामकाज सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

स्टार्टर सुरू करताच मोटारीने घेतला पेट; सांगलीत भाजीविक्रेत्याचा होरपळून मृत्यू

औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब, आरोग्य सहाय्यक  गट- क, सहाय्यक परिचारिका, बहुउद्देशिय आरोग्य कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका प्रसविका, अंशकालीन स्त्री परिचर अशी पदे भरण्यात येणार आहे.

सातारा, औरंगाबाद, बुलडाणा, नागपूर, अहमदनगर, जालना, नंदुरबार, गोंदिया वर्धा, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद, पालघर, चंद्रपूर, रायगड, लातूर, सातारा, कोल्हापूर, वाशिम, नांदेड आणि पुणे या ठिकाणी ही भरती होणार आहे.

First published:

Tags: Jobs