ठाकरे सरकारचा मराठा समाजाला दिलासा, आरोग्य विभागाच्या जम्बो भरतीत EWS मधून पदे भरणार

health department recruitment : एकूण 13000 हजार रिक्तपदासाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये EWS मधून पदे भरण्यात येणार आहे.

health department recruitment : एकूण 13000 हजार रिक्तपदासाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये EWS मधून पदे भरण्यात येणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 जून: मराठा आरक्षण (maratha reservation) रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात आंदोलनाची ठिणगी पडली आहे.  EWS आरक्षणाच्या निर्णयानंतर ठाकरे सरकारने (Thackery Government)मराठा समाजाला आरोग्य विभागातील भरतीमध्ये (health department  recruitment) एसईबीसी प्रवर्गातील पद खुले केले आहे. त्यामुळे EWS प्रवर्गातून मराठा समाजाला अर्ज करता येणार आहे. ग्रामविकास विभागाने आरोग्य विभागातील भरतीचा आदेश काढला आहे. मार्च 2019 मध्ये याबद्दल जाहिरात देण्यात आली होती. एकूण 13000 हजार रिक्तपदासाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये EWS आरक्षणातून भरती करण्यास ठाकरे सरकारने मुभा दिली आहे. मार्च 2019 मध्ये मेगाभरतीची जाहिरात काढण्यात आली होती. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे भरण्यात येणार आहे. HBD: 'त्याने मला कपडे काढून'...सोनल वेंगुर्लेकरसोबत घडला होता धक्कादायक प्रसंग काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्यामुळे मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. या आदेशामुळे मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार आहे, त्यासाठी 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार या आरक्षणाचा 10 टक्के फायदा घेऊ शकणार आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागातील भरतीमध्ये मराठा समाजातील तरुणांना अर्ज करता येणार आहे. एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून संधी दिली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज भरले असतील त्यांनी आपले अर्ज 1 ते 21 जुलै 2021 दरम्यान खुल्या वर्गात ठेवायचे आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या EWS प्रवर्गातून पर्याय उपलब्ध राहणार आहे. सलग 365 दिवस पाण्यात उडी मारत राहिली ही व्यक्ती; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क आरोग्य विभागासाठी भरतीचा आदेश काढण्यात आला आहे. सलग दोन दिवस ही परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा 1 ते 5 ऑगस्ट ऑनलाईन दिले जाणार आहेत.  7 ऑगस्टसाठी आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी  8 ऑगस्टला आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी लेखी परीक्षा होईल. महिन्याभरातच नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published: