मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण; जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा, भाजपची मागणी

प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण; जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा, भाजपची मागणी

ठाकरे सरकारमधला आणखी एक मंत्री अडचणीत, भाजपने केली राजीनाम्याची मागणी

ठाकरे सरकारमधला आणखी एक मंत्री अडचणीत, भाजपने केली राजीनाम्याची मागणी

One more minister of Thackeray Government in trouble: ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणती येताना दिसत आहे. भाजपने आक्रमक होत मंत्री शंकरराव गडाख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 3 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत येताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP spoksperson Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केशव उपाध्ये पत्रकार परिषदेत म्हणाले, या राज्य सरकारमधील रोज एक मंत्री कुठल्या ना कुठल्या प्रकरणामुळे अडचणीत येत आहे. महिलांवर अत्याचार, भ्रष्टाचार, खंडणी, वसुली असे कुठल्या ना कुठले आरोप राज्यसरकारमधील मंत्र्यांवर असताना आता नवी प्रकरण समोर आले आहे. सर्व मर्यादा पार करणारे प्रकरण पुढे आले आहे. एका मंत्र्यांचा पीए म्हणवणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला होता पण कुणीच दखल घेतली नाही. प्रतिक हा शंकरराव गडाख यांच्याकडे काम करत होता.

केशव उपाध्ये यांनी पुढे म्हटलं, प्रतीक काळेने (Pratik Kale suicide) या क्लिपमध्ये सांगितले आहे की माझा मानसिक छळ करत आहेत. त्याने दहा नावं घेतली आहेत. पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले पण तीन जणांवर अळी मिळी गुपचिळी आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे.

प्रतीकला न्याय मिळणार आहे का हा पहिला प्रश्न आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा. जर ते राजीनामा देणार नसतील तर त्यांना पदावरून काढा. प्रतीक काळे याच्यावर आत्महत्येची वेळ का आली याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणीही यावेळी केशव उपाध्ये यांनी केली आहे.

वाचा : "The Lalit मे छुपे है कई राज..." म्हणत नवाब मलिकांचं सूचक Tweet, रविवारी करणार नवा गौप्यस्फोट

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अहमदनगरमधील दंत महाविद्यालयात प्रतीक काळे हा तरुण काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करुन ते सोशल मीडियात पोस्ट केले होते. जलसंधारणंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली हे दंत महाविद्यालय आहे.

प्रतीक काळे याच्या आत्महत्येनंतर त्याच्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या प्रकरणी अहमदनगरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोटनिवडणुकांत भाजपच्या जागा वाढल्या - केशव उपाध्ये

काल देशभरातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालावर केशव उपाध्ये म्हणाले, काल ज्या पोटनिवडणूका झाल्या... देशभरात 30 ठिकाणी झाल्या. त्यापैकी 6 भाजपच्या आणि 11 मित्र पक्षाच्या होत्या. आता भाजपच्या जागा वाढून 7 आणि मित्रपक्षाच्या 14 झाल्या आहेत. त्यामुळे देशात आमचा विजय झाला आहे. काहींना हौस असते भाजपची माघार भाजपची माघार म्हणायची.

First published:

Tags: Ahmednagar, BJP, Suicide, Uddhav thackeray