Home /News /mumbai /

ठाकरे सरकारची 'महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन' मोहीम राज्याला देणार प्राणवायू

ठाकरे सरकारची 'महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन' मोहीम राज्याला देणार प्राणवायू

Representative Image

Representative Image

महाराष्ट्र सरकारने कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आता ऑक्सिजन मोहीम सुरू केली आहे.

मुंबई, 5 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus 2nd wave) राज्यात अक्षरश: थैमान घातले आणि यामुळे राज्यात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडण्यास सुरूवात झाली. ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) निर्माण झाला. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजन मागवण्यात आला. आता कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus third wave) येण्याची भीती व्यक्त केली जात असताना राज्य सरकारने या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करण्याची मोहीम सुरू केली आहे. पाहूयात काय आहे ही 'महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन' (Maharashtra Mission Oxygen) मोहीम. 'महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन' ऑक्सिजनचा निर्मिती, साठवण आणि वितरण या बाबत महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी "महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन" ही मोहीम सुरू कण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रत 1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यापैकी 1295 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रात होते. तर सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजन आपणास इतर राज्य व केंद्र शासनाच्या मदतीन उपलब्ध होत आहे. सद्यस्थितीत असलेल्या 38 PSA प्लांटस मार्गात 53 मेट्रिक टनची निर्मिती होत आहे. तसेच अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, महाराष्ट्र स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे 382 अतिरिक्त PSA प्लांटसची स्थापना करण्यात येत आहे. याच्यामाध्यमातून जवळपास 240 मेट्रिक टनची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांटस जून अखेरील सक्रिय होणार आहेत. वाचा: 'मुंबई पालिकेनं करून दाखवलं, जरा त्यांच्याकडून शिका!' सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं ऑक्सिजन निर्मितीसाठी अतिरिक्त प्लान्ट्स या उपक्रमामुळे राज्यातील हॉस्पिटल्स ऑक्सिजनबाबत स्वावलंबी होतील. भविष्यातील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा दीर्घकालावधीत विचार करता, विभागीय स्तरावर शासनामार्फत लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मितीकरता अतिरिक्त प्लान्ट्स स्थापना करण्यात येणार आहे. परिणामी राज्यात दर दिवशी अतिरिक्त 300 मेट्रिक टनचा पुरवठा होणार आहे. शासन तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभाग स्तरावर ऑक्सिजन साठवणीचे विकेंद्रीकरण सुद्धा करीत आहे. विभागीय स्तरावर 750 मेट्रिक टन आणि जिल्हा स्तरावर 300 मेट्रिक टन साठवण क्षमता तयार केली जाईल. तसेच स्थानिक उद्योजकांच्या मदतीने 600 मेट्रिक टन अतिरिक्त साठवण क्षमता तयार होऊ शकेल. सध्याच्या 1600 मेट्रिक टन साठवण क्षमतेनंतर ही महाराष्ट्राची साठवण क्षमता 3250 मेट्रिक टन होईल. या साठवण क्षमतेच्या विकेंद्रिकारणामुळे वाहतुकीची आवश्यकता कमी होईल आणि ऑक्सिजनचे अखंड वितरण होईल. ऑक्सिजन ऑन व्हील्स रुग्णालयांमध्ये पुरेशी ऑक्सिजन क्षमता देण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी म्हणून शासन अन्य योजनांचाही विचार करीत आहे. याशिवाय 'ऑक्सिजन ऑन व्हील्स' सारख्या प्रारुपंचा ही शासन विचार करीत आहे ज्यामुळे रूग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकेल.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Maharashtra, Oxygen supply

पुढील बातम्या