जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 5298 कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 5298 कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे.  जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 5298 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणास्तव सेवा समाप्त होणाऱ्या आणि यापूर्वी सेवा समाप्त करण्यात आलेल्या अंदाजे 5298 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना मानवतावादी दृष्टीकोनातून तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांकरीता नेमणूक देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

सर्व प्रशासकीय विभागांनी खुद्द आणि त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या खालील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संवर्गनिहाय संख्या निश्चित करावी, त्याचबरोबर त्यांच्या सेवा अधिसंख्य पदांवर वर्ग करून त्यांची पदे 31 डिसेंबर, 2019 पर्यंत रिक्त करणाच्या सूचना देखील करण्यात आल्या आहे.

दादा, तुम्ही DCM झालंच पाहिजे, कार्यकर्त्याच्या मागणीला अजित पवारांचं हे उत्तर

सर्व प्रशासकीय विभागांनी खुद्द आणि त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील वरील प्रमाणे रिक्त होणारी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची पदे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र धारक उमेदवारांमधून    सेवाप्रवेश  नियमानुसार विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून पदे भरण्याची कार्यवाही करावी, असंही या बैठकीत ठरलं आहे.

मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, सहाव्या मजल्यावरून मारली उडी!

अधिकारी आणि कर्मचारी यांना अधिसंख्य पदांवर तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांकरीता नेमणूक दिल्यानंतर त्यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवाविषयक आणि  सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी स्वतंत्र मंत्री गटाची स्थापना करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: CMO
First Published: Dec 14, 2019 05:42 PM IST

ताज्या बातम्या