अमितच्या लग्नात ठाकरे कुटुंबीयांचा साधेपणा, ग्रँड विवाह सोहळ्यातला हा फोटो पाहण्यासारखा!

अमितच्या लग्नात ठाकरे कुटुंबीयांचा साधेपणा,  ग्रँड विवाह सोहळ्यातला हा फोटो पाहण्यासारखा!

राज ठाकरे सासरेबुवा झाले तर शर्मिला ठाकरे सासूबाई... कारण, राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे हे विवाहबंधनात अडकले आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलगा अमित आज लग्नबेडीत अडकला.  या लग्नात अनेक राजकीय मंडळींपासून ते बाॅलिवूड आणि उद्योजकांनी हजेरी लावली होती. परंतु, या लग्नात ठाकरे कुटुंबीयांचा साधेपणाही पाहण्यास मिळाला. जे सुरक्षारक्षक सावलीसारखे आपल्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्यासोबतही अमित आणि मिताली यांनी फोटो काढला. यावेळी त्यांच्यासोबत राज यांची मुलगी उर्वशीही होती.

जवळपास महिनाभरापासून कृष्णकुंजवर ज्याची लगबग सुरू होती तो क्षण अखेर आज आला. राज ठाकरे सासरेबुवा झाले तर शर्मिला ठाकरे सासूबाई... कारण, राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे हे विवाहबंधनात अडकले आहे. मुंबईतल्या लोअर परळ परिसरातल्या सेंट रेजिसमध्ये मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलं. या लग्नासाठी प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींनी आवर्जून हजेरी लावली.

मुहूर्ताच्या ठोक्यावर थोरले ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्यसह हजर झाले. याशिवाय सगळे राजकीय हेवेदावे बाजुला ठेवून प्रमुख राजकीय नेते वधु-वराला आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला उपस्थित होते.

राजकीय नेत्यांशिवाय सचिन तेंडुलकर, आशा भोसले, रतन टाटा, बाबासाहेब पुरंदरे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गजही अमित आणि मितालीच्या लग्नाला उपस्थित होते.

आपण पाहु शकतो की कशाप्रकारे जवळपास प्रत्येक पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी अमित आणि मितालीच्या लग्नाला हजेरी लावली... राजकीय वस्त्र बाजूला ठेवून राज ठाकरे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधापोटी या नेत्यांनी लग्नाला उपस्थित राहत वधू आणि वराला आशीर्वाद दिला.. उद्धव ठाकरे आज फक्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नव्हे राज ठाकरे यांचे थोरले बंधू आणि अमित ठाकरेचे काका म्हणून लग्नाला उपस्थित होते.. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातला जिव्हाळा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आज त्याची प्रचिती पुन्हा अमित ठाकरेच्या लग्नाच्या निमित्तानं पाहायला मिळाली.

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी देखील लग्नाचा मुहूर्त साधला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी देखील अमितालीच्या विवाहाला उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता यांच्यासह लग्नाला हजर होते तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील राज ठाकरेंच्या आमंत्रणाला मान देत लग्नाला उपस्थित राहून अमित आणि मितालीला आशीर्वाद दिला.

राज ठाकरे यांचे ऋणानुबंध फक्त राजकीय वर्तुळापुरते मर्यादीत नाही आहेत. तर क्रीडा,कला, चित्रपट, उद्योग क्षेत्रातही त्यांचे अनेक स्नेही आहेत. म्हणूनच अमित ठाकरेंच्या लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गजांचा समावेश होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह लग्नाला आला होता.

राज ठाकरेंच्या आग्रहाला मान देत ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी देखील लग्नाला हजेरी लावली. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट अर्थात आमीरनं देखील लग्नाचा मुहूर्त चुकवला नाही. अभिनेता रितेश देशमुख कुटुंबीयांसह लग्नाला हजर राहिला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्यातला जिव्हाळा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पुरंदरेंनी देखील लग्नाला उपस्थिती लावत अमित आणि मितालीला आशीर्वाद दिले. उद्योगरत्न म्हणजेच रतन टाटा देखील अमिताली या जोडीला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

=========================

First published: January 27, 2019, 9:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading