Home /News /mumbai /

दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन; दहशतवादी अटकेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

दहशतवाद्यांचे मुंबई कनेक्शन; दहशतवादी अटकेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Dilip Walse Patil reaction on terrorist mumbai connection: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर मुंबई कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

    मुंबई, 15 सप्टेंबर : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) सहा दहशतवाद्यांना अटक (6 terrorist arrested) केली आहे. यापैकी एक दहशतवादी हा मुंबईत (Mumbai) राहत असल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली. या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर उत्तरप्रदेशातील निवडणुका, दिल्ली आणि मुंबईतील काही महत्त्वाची ठिकाणे असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचं मुंबई कनेक्शन (Mumbai connection) समोर आल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीची एक बैठक बोलवली. पोलीस आयुक्त, गृह खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. दुपारी 3 वाजता एटीएस प्रमुखांची पत्रकार परिषद गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, काही संशयित व्यक्तींना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. संपूर्ण घटनेच्या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली. एटीएसच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण घटनेवर नजर आहे. या संदर्भात दुपारी 3 वाजता एटीएस प्रमुख पत्रकार परिषद घेतील. पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन, दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर दहशतवाद्यांचे दाऊद सोबत संबंध आहेत की नाही याबाबत एटीएस प्रमुख माहिती देतील. दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईबाबत पूर्ण माहिती हाती आलेली नाहीये. पोलिसांना त्यांच्या पद्धतीने तपास करु दिला पाहिजे. इंटेलिजन्स फेल्युअर नाहीये. कधीकधी आयबी सुद्धा माहितीवर काम करतात आणि हे नेहमीच राज्यांसोबत शेअर केले जाते असं नाहीये असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप नाहीये. प्रत्येकाने राज्याला, पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. Kasab ने ट्रेनिंग घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच Dawood च्या हस्तकांनी घेतलेली ट्रेनिंग मिळालेल्या माहितीनुसार, अटक कऱण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानातील थट्टा टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. फिदाईन हल्ला करण्याचे ट्रेनिंग दिले होते, लोकांना ओलीस ठेवण्याचे ट्रेनिंग तसेच एकाच वेळे अनेक ठिकाणी कसे हल्ले करायचे याचे ट्रेनिंग दिले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. याच टेरर कॅम्पमध्ये 26/11 हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब यानेही ट्रेनिंग घेतली होती.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai, Terrorist

    पुढील बातम्या