मुंबईला धोका? 'दहशतवादी हल्ला होणार' अशा मेसेजने खळबळ

मुंबईला धोका? 'दहशतवादी हल्ला होणार' अशा मेसेजने खळबळ

नालासोपारा राधानगर इथे दहशतवादी कारवाया केल्या जाणार असून चौरसिया पान भंडार त्यांच्या रडारवर असल्याचे मेसेजमध्ये लिहण्यात आलं आहे.

  • Share this:

नालासोपारा, 12 जुलै : नालासोपारामध्ये नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन जगत आहे. कारण, पूर्वेकडील राधानगर येथे दहशतवादी हल्ला होणार असल्याच्या मेसेजने खळबळ उडाली आहे. तुळींज पोलीस, एटीएस पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणी चौकशीसाठी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे चौरसिया पान भंडार हे त्यांच्या रडारवर असल्याचं त्या मेसेजमध्ये लिहण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

नालासोपारा राधानगर इथे दहशतवादी कारवाया केल्या जाणार असून चौरसिया पान भंडार त्यांच्या रडारवर असल्याचे मेसेजमध्ये लिहण्यात आलं आहे. आज सकाळी 11:23 वाजता इंटरनॅशनल नंबरवरून त्यांना मेसेज आला. त्यामुध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 'मी दीपक राय बोलतोय. मला बातमी मिळाली आहे कि दहशदवादी हल्ल्याचा कट रचला जात आहे. तुम्हाला हे थांबवण्यात रस असेल तर पटकन मला मेसेज करा. मी तुम्हाला त्यांचे नंबर आणि फोटो देतो.' असं त्या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. एखाद्या नंबरवरून अशा पद्धतीने मेसेज आल्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बुधवारी 4 वाजता चौरासिया पान भंडार राधानगरमध्ये अज्ञात इसमाने अलिशान पटेलचा फोटो पाठवला असून तो या कटाचा मास्टर माइंड असल्याचं मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेगळं वळण लागलं आहे. मेसेज ज्या नंबरवरून आला तो शोधण्याचं काम आणि त्याचं लोकेशन मिळवण्याचं काम सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे.

'मिशन पूर्ण झाल्यावर मला माझ कमिशन द्यावं. माझ्याकडे आताची ताजी बातमी असून 2 हत्यारं त्यांच्या ओसवाल नगरी सर्विस सेंटरमध्ये ठेवतात.' अशी माहिती सोशल मीडियावर दिवाकर शुक्ला यांना अज्ञाताने पाठवली आहे. या सगळ्या प्रकारामुळे नालासोपारामध्ये नागरिकांच्या जीवाला धोका आहे का असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

या मेसेजमध्ये नालासोपारा प्रगतीनगरमध्ये राहत असलेल्यांची नावे आहेत. रफिक पटेल 33, जावेद पटेल 30, आलिशान पटेल 26, ताहेर पटेल 22, तौफिक पटेल 22, अशा अजून 15 लोकांची नाव मेसेमध्ये लिहण्यात आली आहेत. एटिस, एलसीबीसह तुळींज पोलिसांनी 5 जणांना चौकशीसाठी बोलावलं आहे. तर पुढील तपास तुळींज पोलीस करत आहेत.

VIDEO: मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शसकीया पूजा

First published: July 12, 2019, 7:14 AM IST

ताज्या बातम्या