काळ आला होता पण..., मालगाडीच्या धडकेनंतरही तरुणी बचावली

काळ आला होता पण..., मालगाडीच्या धडकेनंतरही तरुणी बचावली

  • Share this:

मनोज कुलकर्णी, मुंबई; 04 जून : मालगाडी अंगावरुन गेल्यानंतरही एक तरुणी आश्चर्यकारकरित्या बचावल्याची घटना कुर्ला रेल्वे स्टेशनवर घडलीये. मोबाईलवर बोलणं या तरुणीला थेट मृत्यूच्या दारात घेऊन गेलं होतं.

जरा ही दृश्यं पाहा... ही दृश्यं काळजाचा ठोका चुकवणारी आहेत. ही दृश्य पाहाणाऱ्याला तरुणी वाचलीच नसेल असं वाटेल. पण एवढा मोठा अपघात झाल्यानंतरही ती तरुणी अपघातातून बचावली आहे.

कुर्ला रेल्वे स्टेशनवर ही घटना घडला आहे. ही तरुणी कुर्ल्यात रेल्वे रुळ ओलांडत होती. त्यावेळी ती मोबाईलवर बोलत होती. मोबाईलवर बोलण्यात ती एवढी गुंग झाली होती की तिला समोरुन मालगाडी आल्याचं कळलंच नाही. जेव्हा मालगाडी आली तेव्हा प्लॅटफॉर्मवरील लोकांनी आरडाओरडा केला. तरुणीच्या जेव्हा हे लक्षात आलं त्यावेळी उशीर झाला होता.

गांगरलेली तरुणी रेल्वे इंजिनाकडं धावली. त्यानंतर इंजिननं जोरदार धडक दिल्यानंतर, ती दोन्ही रुळांच्यामध्ये पडली. प्रवाशांनी लगेचच मालगाडी थांबवली. या तरुणीला बाहेर काढून राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर तिला सोडून देण्यात आलं. पण या अपघाताच्या निमित्तानं काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल.

First published: June 4, 2017, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading