Home /News /mumbai /

Weather Forecast: राज्यात ऊन पावसाचा खेळ; मुंबईत वाढला पारा, या जिल्ह्यांत कोसळणार सरी

Weather Forecast: राज्यात ऊन पावसाचा खेळ; मुंबईत वाढला पारा, या जिल्ह्यांत कोसळणार सरी

मागील तीन दिवसांत मुंबईतील तापमान जवळपास 6 अंश सेल्सिअसनं तापमान वाढलं आहे. (फोटो-फ्लिपबोर्ड)

मागील तीन दिवसांत मुंबईतील तापमान जवळपास 6 अंश सेल्सिअसनं तापमान वाढलं आहे. (फोटो-फ्लिपबोर्ड)

Weather Forecast in Maharashtra: महाराष्ट्रात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे. राज्यातून पाऊस गायब होताच मुंबईत उष्णतेचा पारा वाढला (Temperature in Mumbai) आहे.

    मुंबई, 23 ऑगस्ट: मागील आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी हलक्या सरी कोसळल्यानंतर राज्यात पुन्हा मान्सूननं ब्रेक (Monsoon Break in Maharashtra) घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे. राज्यातून पाऊस गायब होताच मुंबईत उष्णतेचा पारा वाढला (Temperature in Mumbai) आहे. मागील तीन दिवसांत मुंबईतील तापमान जवळपास 6 अंश सेल्सिअसनं तापमान वाढलं आहे. असं असलं तरी काही विदर्भातील काही जिल्ह्यांत मात्र आज पावसाची शक्यता (Rain Alerts) हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. आज नागपूरसह भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. दरम्यान याठिकाणी 30 - 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा-महाराष्ट्रात तिसरी लाट येणार का? विषाणूचा धोका कितपत? तज्ज्ञांचा मोठा खुलासा एकीकडे राज्यातून पाऊस गायब होताच राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान वाढल्यानं नागरिकांना उकाड्याचा त्रासही होतं आहे. सांताक्रूझ वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत मुंबईत 6 अंश सेल्सिअसनं तापमान वाढलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सरासरी तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास होतं. पण राज्यातून पाऊस गायब होताच, मुंबईतील तापमान 33 वर पोहोचलं आहे. सध्या मुंबईत निरभ्र आकाश असून येथे पावसाची शक्यता जवळपास नाहीच. हेही वाचा-रात्रभर रांगेत उभं राहूनही नाही मिळाली लस; लसीकरण केंद्राबाहेरच नागरिकांचा राडा दुसरीकडे, पुढील दहा दिवस राज्यातून मान्सून गायब असेल, अशी माहिती हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या  पहिल्या आठवड्यात मान्सूनचं कमबॅक (Monsoon Comeback) होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, Weather forecast

    पुढील बातम्या