स्वेटर शोधून ठेवा, पुढच्या चार दिवसांमध्ये राज्याला भरणार हुडहुडी!

स्वेटर शोधून ठेवा, पुढच्या चार दिवसांमध्ये राज्याला भरणार हुडहुडी!

सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झालीय. त्यामुळे थंडीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झालीय. सध्या काश्मीरमध्ये हिमवर्षाव होत असल्याने त्याचाही परिणाम राज्यातल्या वातावरणावर होणार आहे.

  • Share this:

मुंबई 03 डिसेंबर : डिसेंबर महिना सुरू झाला तरी अजुन राज्यात थंडीचा जोर वाढलेला नाही. नाहीतर डिसेंबर महिन्यात राज्याचा पारा खाली येतो. मात्र यावर्षी पावसाळा महिनाभर लांबल्याने थंडीचं आगमनही लांबलंय. मात्र आता वातावरण अनुकूल असल्यानं उत्तरेतून वाहणारा थंड वारा वेगाने पुढे सरकत असून येत्या चार पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतेक भागात थंडी वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेने व्यक्त केलाय. पुढच्या चार दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांत तापमानाचा पारा खाली घसरणार असून हुडहुडी जाणवायला लागेल असा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केलाय.

मोसमी पाऊस राज्यातून परतल्यानंतर अवकाळी पावसाचं आगमन झालं. सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झालीय. त्यामुळे थंडीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झालीय. दरवर्षी या काळात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पारा चांगलाच खाली येतो. सध्या काश्मीरमध्ये हिमवर्षाव होत असल्याने त्याचाही परिणाम राज्यातल्या वातावरणावर होणार आहे. काश्मीरप्रमाणेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेतल्या थंडीचं प्रमाणही वाढणार आहे.

पंढरपूरच्या हिंदू संमेलनात 'नथुराम गोडसे अमर रहे' च्या घोषणा!

मान्सूनचं हे परत जाणं तब्बल एक महिन्याने लांबल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. सुरुवातीला थोडा रखडणारा मान्सूनने नंतर सर्व राज्यभर प्रचंड धुमाकूळ घातला होता. तर काही भागाकडे पाठ फिरवली. मात्र कोल्हापूर, पुणे आणि मुंबईत गेल्या काही दशकांमधला हा सर्वात जास्त पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. परणारा मान्सून अतिशय वेगाने महाराष्ट्राबाहेर जात असून जाताना तो बरसणार का अशी भीती होती. मान्सून परतल्यानंतर ऑक्टोबर उष्णता भडकण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली होती. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. नंतर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या बऱ्याच भागातून मान्सूनची एक्झिट झाली होती.

भाजप सोडणार का? 'त्या' फेसबुक पोस्टबद्दल पंकजांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..

तब्बल महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मान्सूनचं वास्तव्य लांबलं होतं.  परतणाऱ्या मान्सूनने  पुण्यात धुमाकूळ घातला होता. कधी नव्हे ते काही तासांच्या पावसाने पुणे जलमय झालं होतं. अनेक वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी भरलं. 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आणि कोट्यवधींची हानी झाली होती.

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूराने तर सर्वच विक्रम मोडीत काढले. वर्षभरात होणारा पाऊस काही दिवसांमध्ये पडला आणि दोन जिल्हे पाण्यात बुडाले होते. हवामानाच्या बदलामुळे पावसाचा हा लहरीपणा वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cold wave
First Published: Dec 3, 2019 09:25 PM IST

ताज्या बातम्या