तेलंगणाच्या कृषीमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे कौतुक

तेलंगणाच्या कृषीमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे कौतुक

महाराष्ट्राकडून मार्गदर्शन घेण्यासाठी विशेष भेटीवर आल्याचे तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी यावेळी सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. महाराष्ट्र फळबाग लागवडीत देशात प्रथम क्रमांकावर असून त्या बाबतीत महाराष्ट्राकडून मार्गदर्शन घेण्यासाठी विशेष भेटीवर आल्याचे तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी यावेळी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून या क्षेत्रात तेलंगणा राज्याच्या कृषी विभागाच्या अभिनव योजनांचा अभ्यास केला जाईल, असं राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले.

फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, तेलंगणाच्या पणन संचालक श्रीमती लक्ष्मी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, अलिबाग नंतर मुंबई पोलिसांनी केला नवा गुन्हा दाखल

कृषी क्षेत्रात महाराष्ट्राकडून शिकण्यासारखे खूप असून महाराष्ट्र दौरा त्यासाठी लाभदायी ठरेल, असं एस. निरंजन रेड्डी यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचे विशेष कौतुक रेड्डी यांनी केले. यावेळी त्यांनी तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

राज्याचे कृषी सचिव डवले यांनी सादरीकरणादरम्यान विविध कृषी योजनांची माहिती दिली.

Published by: Akshay Shitole
First published: November 4, 2020, 7:11 PM IST

ताज्या बातम्या