Home /News /mumbai /

तातडीने हस्तक्षेप करा, तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

तातडीने हस्तक्षेप करा, तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'महिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे'

'महिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे'

'महिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे'

    मुंबई, 20 ऑगस्ट  : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore audio case) यांच्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना पत्र पाठवून केली आहे. 'ज्योती देवरे यांनी 11 मिनिटांची एक ऑडियो क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींवर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचार्‍यांना पोलीस अधिकार्‍यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, महिला कर्मचार्‍यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त झाल्या आहे,  कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्‍यांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार घडला आहे, असं फडणवीस पत्रात म्हणाले आहे. त्रिशाकर मधुच्या MMS नंतर अभिनेत्री प्रियांका पंडितचा प्रायव्हेट VIDEO लीक तसंच,  दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे' असंही फडणवीस म्हणाले. 'तालिबानी भावांना राखी बांधेन आणि..' म्हणत अभिनेत्रीने PMमोदींनाच विचारला प्रश्न 'कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकार्‍याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकार्‍याला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्‍याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच कळकळीची विनंती, असंहीफडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या