Home /News /mumbai /

युट्यूब व्हिडीओसाठी स्टंटबाजी, विद्यार्थ्याने गमावला जीव

युट्यूब व्हिडीओसाठी स्टंटबाजी, विद्यार्थ्याने गमावला जीव

युट्यूबवर लाईक्स आणि हिट मिळावे म्हणून स्टंट करणे 17 वर्षीय विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले.

    मुंबई, 23 मार्च : सोशल मीडियावर अनेक ट्रेंड येत असतात. त्या ट्रेंडनुसार प्रत्येकजण काहीना काही पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक टॉक, युट्यूवर सतत अपडेट राहण्याच्या अट्टाहासापोटी जीवघेणे प्रकार केल्याचे पहायला मिळत आहे. लाइक्स आणि हिट कमीत कमी वेळेत मिळावे यासाठी काहीतरी हटके करण्यासाठी मुले धडपडतात. त्यासाठी वेगवेगळे स्टंट करण्याकडे या मुलांचा ओढा असते. असाच एक व्हिडीओ करण्यासाठी धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. मोहम्मद जुबेर असं 17 वर्षीय मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वजाळा पूर्व, बरकत अली नाका येथे राहणारा तरुण सीएसएमटी इथं एका शाळेत शिकत होता. शाळेतून लोकलने घरी परत येत असताना त्याने दरवाज्यात उभा राहून स्टंटबाजीला सुरुवात केली. डब्यातील लोकांनी त्याला आत बसण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याकडे कानाडोळा करत मोहम्मदने स्टंटबाजी सुरूच ठेवली. सॅण्डहर्स्ट रोड ते डॉकयार्ड रोड स्थानकादरम्यान लोकल असताना मोहम्मदने दरवाज्यातील खांबाला पकडून शरीर लोकल बाहेर झोकून दिले. त्यावेळी रुळाच्या बाजुला असलेल्या एका खांबाला मोहम्मद धडकला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणे, त्याचे व्हिडीओ करणे जीवावर बेतू शकते. अशा प्रकारचा धोका पत्करु नये यासाठी सातत्याने रेल्वे पोलिस आणि प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. मात्र, मुले, त्यांचे पालक यांच्यासह तरुणांनी आता ही गोष्ट गांभीर्यांने घेतली पाहिजे असं वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलिसांनी सांगितले. VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai local train, Youtube

    पुढील बातम्या