गुरूच्या नात्याला कलंक, क्लासच्या शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनींचा केला विनयभंग

नवी मुंबईतील सानपाडा येथील एका खाजगी शिकवणी केंद्रात अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2018 05:19 PM IST

गुरूच्या नात्याला कलंक, क्लासच्या शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनींचा केला विनयभंग

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

नवी मुंबई, 30 ऑक्टोबर : तुम्ही तुमच्या मुलांना खासगी ट्युशनला तर पाठवत असाल तर ही बातमी नक्की वाचा.  नवी मुंबईतील सानपाडा येथील एका खाजगी शिकवणी केंद्रात अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे तुमची मुलं क्लासेसमध्ये किती सुरक्षित आहेत याचा आताच विचार करा.

सानपाडामध्ये असलेल्या एकलव्य या खाजगी कोचिंग क्लासमध्ये एक अकरावीच्या विद्यार्थिनीवर त्याच क्लासच्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी ही साडेसतरा वर्षांची आहे. पीडितेवर तिच्याच क्लासच्या शिक्षकाने विनयभंग केला. त्यामुळे ही विद्यार्थिनीने अजूनही या धक्क्यातून सावरली नाहीय.

पीडित मुलीने आपल्या घरी सदर प्रकारची माहिती दिल्यावर कुटुंबीयांनी सानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सानपाडा पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी शिक्षक अशोक जाधव याला अटक केली. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : वानराने गारुड्याचा साप पळवला आणि खाऊन टाकला

Loading...

बरं इतकंच नाही तर या गुरू या नात्याला कलंक लावणाऱ्या या आरोपी शिक्षकाने आणखी अनेक विद्यार्थिनींसोबत अत्याचार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर यावर पोलीस आता या सगळ्याचा कसून तपास करणार आहेत.

या प्रकरणात पोलीस क्लासच्या संपूर्ण विद्यार्थ्यांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर यात आता क्लासच्या इतर शिक्षकांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे आपल्या मुलांना क्लासला पाठवण्याआधी क्लासचा परिसर आणि शिक्षकांबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे.

VIDEO: झाकणात अडकलेल्या सगळ्यात विषारी सापाला 'असं' केलं मुक्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...