धक्कादायक: ट्युशनला येणाऱ्या 7वीच्या विद्यार्थ्यानेच केली शिक्षिकेची हत्या

धक्कादायक: ट्युशनला येणाऱ्या 7वीच्या विद्यार्थ्यानेच केली शिक्षिकेची हत्या

शिक्षिकेने पुन्हा नकार देताच त्याने आपल्या जवळच्या चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षिकेच्या पोटात आणि पाठीवर त्याने सपासप वार केले.

  • Share this:

मनोज कुलकर्णी, मुंबई 17 सप्टेंबर : विद्यार्थी आणि शिक्षिकाचं नातं हे पवित्र आणि प्रेमाचं समजलं जातं. मात्र मुंबईत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका अल्पवयीन मुलाने आपल्या ट्युशनच्या शिक्षेकेची हत्या केल्याचं उघड झालंय. किरकोळ कारणांवरून त्याने शिक्षेकेवर हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. त्यात त्या शिक्षिकेचा मृत्यू झाला. रागाच्या भरात केलेल्या या हल्ल्याने त्या विद्यार्थ्याने शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासलीय. मुंबईतल्या गोवंडी परिसरात ही घटना घडली असून या घटनेने सर्व परिसर हादरून गेलाय.आयेशा अस्लम हुसिये (वय 30) या शिक्षिका गोवंडीतल्या शिवाजीनगर परिसरात राहतात. आयेशा या ट्युशन घेऊन आपलं घर चालवत होत्या. त्यांच्याकडे आरोपी मुलगा (वय 12) हा ट्युशनला येत असे. तो सातव्या वर्गात होता अशी माहिती दिली जातेय.

शिवसेनेत प्रवेश करणार का? उर्मिला मातोंडकरांनी दिलं हे स्पष्टीकरण!

त्याने आयेशांकडे काही पैशांची मागणी केली. आपल्या आईला घरात काही सामान आणयचं आहे त्यासाठी पैसे हवे असल्याचं त्याने आयेशा यांना सांगितलं. मात्र आपल्याकडे पैसे नाहीत असं शिक्षिकेने सांगितल्यानंतर या मुलाला राग आला. काही वेळात तो पुन्हा त्यांच्याकडे चाकू घेऊ आला आणि पैशाची मागणी करत तो वाद घालू लागला. शिक्षिकेने पुन्हा नकार देताच त्याने आपल्या जवळच्या चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षिकेच्या पोटात आणि पाठिवर त्याने सपासप वार केले.

महाराष्ट्राचा महासंग्राम : गडचिरोलीमध्ये भाजपचंच वर्चस्व राहणार का?

या हल्ल्यात आयेशा या गंभीर जखमी झाल्या आणि प्रचंड रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतलंय. त्याच्याविरुद्ध 302 IPC CR No. 436/19  या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहेत. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला सुधारगृहात पाठवलंय. मात्र घटनेने खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या