मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /भाजप की महाविकास आघाडी? विधान परिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वैशिष्टय

भाजप की महाविकास आघाडी? विधान परिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वैशिष्टय

राज्यात महाविकास आघाडी प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे.  महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे.

राज्यात महाविकास आघाडी प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे.

राज्यात महाविकास आघाडी प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे.

मुंबई, 01 डिसेंबर : आज विधान परिषद 5 जागेसाठी मतदान होत आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर (teacher and graduate constituency election 2020) यासाठी मतदान होणार आहे.  शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (congress) महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच पदवीधर निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप BJP) अशी अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक ठरली आहे. या निवडणूक राजकीय वैशिष्टय काय असणार आहे? याचा हा आढावा...

राज्यात महाविकास आघाडी प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे.  महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे.  महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण होतानाच तीन पक्षात संघटनात्मक ऐक्य निवडणुकीत आहे का यांचे चित्र स्पष्ट होईल.

तर दुसरीकडे भाजप नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.  भाजपात नागपूर पदवीधर निवडणूक ही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्यासाठी तर उर्जा मंत्री नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, अनिल देशमुख यांच्याशी प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे.

अमरावती शिक्षक निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय तर पश्चिम विदर्भात भाजपा वर्चस्व आज ही आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी भाजपाची धडपड सुरू आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. भाजपमध्ये इथं बंडखोरी पाहण्यास मिळाली आहे. एवढंच नाहीतर बीडमधील भाजपचे नेते जयसिंग गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.  तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार आणि महाविकास आघाडी तीन पक्ष एकत्रित येऊन विजय मिळवतील का, हा प्रतिष्ठाचा विषय झाला.

पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व नेमके कोणाचे हे पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक विधान परिषद निवडणूक यावरून दिसणार आहे. भाजपाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जागी रिक्त झालेल्या पदवीधर निवडणूक पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी बालेकिल्ला आहे, हेच सिद्ध करण्यासाठी  जयंत पाटील यांची कसोटी लागली आहे.

पुणे शिक्षक निवडणूक काँग्रेस पक्षाने विजयी करत पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा वर्चस्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी फायदा घेत अपक्ष निवडणूक लढवणारे यांचा फायदा घेण्याचं भाजप वर्चस्व आणू पाहत आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी सरळ एकमेकाच्याविरोधात निवडणूक  होत असली तरी स्थानिक हेवेदावे याचा प्रभाव या निवडणूकीत दिसणार आहे.

बिहार निवडणुकीनंतर राज्यात भाजप यशस्वी कामगिरी करत असल्याचे चित्र फडणवीस यांना निर्माण करायचे आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे ही दाखवण्याची संधी आघाडीच्या नेत्यांना आहे.

अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सतेज  पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर या नेत्यांनी प्रचार करत राजकीय आरोपाच्या फेरी झाडल्या आहे. त्यामुळे आता मतदान कुणाच्या पारड्यात पडत हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published:
top videos