ते देवासारखे धावले आणि वाचवले प्राण

या अशा दोन घटना ज्यामध्ये प्रसंगावधान राखत रेल्वे टीसी आणि सीआरपीएफनी दोघांना जीवदान दिले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2017 02:29 PM IST

ते देवासारखे धावले आणि वाचवले प्राण

मुंबई, 10 सप्टेंबर : या अशा दोन घटना ज्यामध्ये प्रसंगावधान राखत रेल्वे टीसी आणि सीआरपीएफनी दोघांना जीवदान दिले. पहिली घटना आहे कल्याण रेल्वे स्थानकातली. चालत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधून कल्याण स्थानकातील 5 नंबर फलाटावर उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला फलाटावर उभ्या असलेल्या चंचलकुमार या तिकीट तपासणीसाने प्रसंगावधान राखत हात दिल्यामुळे त्याचा जीव वाचला.

6 ऑगस्ट रोजी कल्याण स्थानकात ही घटना घडलीय. सकाळी 11च्या सुमारास बिहारहून मुंबईकडे पाटलीपुत्र एक्सप्रेस येत होती. ही एक्सप्रेस कल्याणमध्ये थांबत नाही. तरीही एका प्रवाशाने यातून उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच तो एक्सप्रेसखाली जाणार इतक्यात टीसी चंचलकुमार यांनी त्या प्रवाशाच्या हाताला धरून उतरवले.

दुसरी घटना आहे नालासोपाऱ्यातील. नालासोपारा रेल्वे स्थानकातल्या फलाट क्र. २ वरून एक महिला आणि तिच्या मुलीने धावती लोकल पकडली. मात्र तिचा पाय घसरल्याने ती फरफटत गेलीय तिथे असलेल्या आरपीएफ सब इन्स्पेक्टर गोपाळकृष्ण रायने तिला लोकल खाली जाता जाता वाचवलं.

ही घटना सीसीटीव्ही नीट पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. शुक्रवारी रात्री ९.१५ च्या सुमारास बोरीवली इथं राहणाऱ्या लता महेश्वरी आणि त्यांची मुलगी प्रीती यांनी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला असता हा सगळा प्रकार घडलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2017 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...