मुंबईत रिक्षा,टॅक्सी भाडेवाढ होण्याची शक्यता

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2018 11:30 AM IST

मुंबईत रिक्षा,टॅक्सी भाडेवाढ होण्याची शक्यता

मुंबई, 22 जून : मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील रिक्षा-टॅक्सीच्या दरांबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) लवकरच एक बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांचा खात्मा करणार 'NSG'ची बलाढ्य फौज

VIDEO : RPFची दादागिरी, शूट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की

गेल्या तीन वर्षांपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन दरवाढीची मागणी करत आहेत.सीएनजीच्या दरातील वाढ आणि जीवनावश्यक खर्च यानुसार भाडेवाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या दोन वर्षात सीएनजीचे दर प्रतिकिलो तीन रुपयांनी वाढलेत. याशिवाय वाहनाचा भांडवली खर्च, वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती खर्च, इन्शुरन्स, कर याचाही विचार केला जाणार आहे.

Loading...

हेही वाचा

औरंगाबादमधले नाले अजूनही उघडेच, पाण्याच्या लोंढ्यात बुलेटही गेली वाहून, चालकाचा मृत्यू

रिक्षाचं किमान भाडं 18 वरुन 20 रुपयांवर जाईल, तर टॅक्सीचं किमान भाडं 22 वरुन 24 रुपयांवर जाईल.नॉन-पिक अवर्समध्ये 'हॅपी अवर डिस्काऊण्ट' देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...