शेवटच्या क्षणी वाचले टाटा सन्सचे 200 कोटी, पोलिसांनी मॉलमधून केली अटक

हॅकर्स टाटा सन्सचं जे बँक खातं हॅक करण्याचा प्रयत्न करत होते, त्यामध्ये तब्बल 200 कोटी रुपयांची रक्कम होती.

  • Share this:

नालासोपारा, 5 मार्च : टाटा सन्सचे बँक खाते हॅक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार येथे टाटा सन्सचे बँक खाते हॅक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॅकर्सना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील मुंबई अहमदाबाद रोड, पेल्हार फाट्याजवळील डिकॅथलॉन मॉलजवळ इंडस बँकतील टाटा संसचे खाते हॅक करण्यासाठी हॅकर आला असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली आहे. डिकॅथलॉन मॉलच्या पार्किंगमध्ये आरोपी नसीम यासीन सिद्धीकी, तस्लीम परवेझ अन्सारी, गनजीव शामजीभाई बारय्या, रोज रामनिवास चौधरी,सतीश अजय गुप्ता, अनंत भुपती घोष, आनंद पांडूरंग नलावडे हे इंडस बँक कस्टमर आयडीचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करीत होते.

हॅकर्स टाटा सन्सचं जे बँक खातं हॅक करण्याचा प्रयत्न करत होते, त्यामध्ये तब्बल 200 कोटी रुपयांची रक्कम होती. हे आरोपी काही क्षणांतच खातं हॅक करणार होते. मात्र अखेरच्या क्षणी पोलीस तिथे धडकले आणि टाटा सन्सचे तब्बल 200 कोटी रुपये वाचले.

हेही वाचा- मुंबईत हत्येचा भयंकर प्रकार, मोबाइल चार्जरची वायर तुटेपर्यंत आवळला मुलाचा गळा

दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुलाबी रंगाचा विवो मोबाईल फोन,एक निळ्या रंगाचा ओपो मोबाईल फोन, एक इंडस बँक कस्टमर आयडी क्रं. 34063 च्या अकाउंटवरील व्यवहाराची छायांकीत प्रत, एक निळ्या रंगाचा विवो मोबाईल फोन, एक पंजाब नॅशनल बँकेचा चेकची छायांकीत प्रत, एक काळ्या रंगाचा विवो मोबाईल फोन बंद स्थितीत असलेला , एक काळ्या रंगाचा ओपो मोबाईल फोन, एक काळ्या रंगाचा मोटो मोबाईल फोन, एक निळ्या रंगाचा विवो मोबाईल फोन, एक फिकट निळे आणि गुलाबी रंगाचा विवो मोबाईल फोन, एक लाल,सफेद व हिरव्या रंगाचा लावा मोबाईल फोन 90 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2020 04:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading