मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Video : दिव्यांगांसाठी टाटाचं मोठं पाऊल; मुंबईतील पहिलं दिव्यांग ग्राहक केंद्र कसं चालतं?

Video : दिव्यांगांसाठी टाटाचं मोठं पाऊल; मुंबईतील पहिलं दिव्यांग ग्राहक केंद्र कसं चालतं?

X
Mumbai

Mumbai News : पहिले 'दिव्यांग' व्यवस्थापित ग्राहक केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्राहक केंद्राचं काम कसं चालतं जाणून घ्या.

Mumbai News : पहिले 'दिव्यांग' व्यवस्थापित ग्राहक केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्राहक केंद्राचं काम कसं चालतं जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    धनंजय दळवी, प्रतिनिधी

    मुंबई, 28 मार्च : मुंबईत टाटा पॉवरने पहिले 'दिव्यांग' व्यवस्थापित ग्राहक केंद्र सुरू केले आहे. जे भारतीय वीज उपयोगितांपैकी पहिले आहे. मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील नित्यानंद नगर येथील केंद्राचे व्यवस्थापन पाच अपंग कर्मचार्‍यांच्या पथकाद्वारे स्वतंत्रपणे केले जात आहे. वैविध्यपूर्ण कर्मचार्‍यांचा समावेश करण्याचा आणि अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात कामाच्या संधींमध्ये प्रवेश करून त्यांना सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न आहे.

    कसं करत काम?

    यापूर्वी, पॉवर युटिलिटी कंपनीने मुंबईत सर्व महिला ग्राहक संबंध केंद्रे यशस्वीपणे सुरू केली होती. देशभरातील इतर केंद्रांप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि विशेष दिव्यांग ग्राहकांसाठी समर्पित काउंटर देखील प्रदान करण्यात आले आहेत. या केंद्रातील कर्मचारी नवीन वीज पुरवठा अर्ज आणि मासिक बिल भरणा यासारख्या विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून ते ग्राहकांच्या समस्या आणि शंकांचे निराकरण देखील करतात. या टाटा पॉवर ग्राहक केंद्रामध्ये हात, पाय, कमी दृष्टी अश्या समस्या असलेले कर्मचारी काम करतात.

    कामाची संधी

    टाटा पॉवरमध्ये आम्ही कर्मचाऱ्यांसाठी सर्व समावेशक धोरण अवलंबलं आहे. त्या अंतर्गत स्त्री पुरुष समानता आणि दिव्यांगांना योग्य कामाची संधी या महत्त्वपूर्ण बाबी आहेत. गेल्या दोन वर्षात पूर्ण महिला ग्राहक केंद्र चार ठिकाणी सुरू करण्यात आली आणि त्याला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. याच धोरणाला अनुसरून दिव्यांगांना कामाची संधी देण्याचा ठरविण्यात आलं आणि त्याकरता दिव्यांग ग्राहक केंद्र सुरू केलं. केंद्र सुरू करताना दिव्यांग यांच्या क्षमता आकांक्षा आणि त्यांच्या विशेष गरजा आणि त्यांची पूर्तता करण्याची विशेष काळजी यामध्ये घेण्यात आलेली आहे. टाटा पॉवरने देशातली पहिली अशी व्यवस्था सुरू केली आहे, असं टाटा पॉवर चीफ डिस्ट्रीब्यूशन अधिकारी डॉ. निलेश काणे यांनी सांगितले.

    प्रत्येक जण हा मदतशीर

    मी टाटा पॉवरमध्ये एक्झिक्यूटिव्ह या पदावर कार्यरत आहे. सुरुवातीला आधी काम करण्याचा प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यानंतरच कामावर रुजू करून घेण्यात आलं आणि या ग्राहक केंद्रामध्ये प्रत्येक जण हा मदतशीर आहे, असं टाटा पॉवर मधील कर्मचारी सरिता कदम यांनी सांगितले.

    लग्नानंतर वराला घ्यावं लागतं वधूचं दर्शन, पाहा काय आहे समर्थांच्या गावातील परंपरा? Video

    घाटकोपरच्या या दिव्यांग ग्राहक केंद्रामध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. हे काम करताना मला फार आनंद होत आहे कारण टाटा पॉवरने दिव्यांगांसाठी हे पूर्णतः नवीन केंद्र स्थापन केले आहे. इथे येणारे ग्राहक देखील मदत करणारे आहेत. आणि इथे येणाऱ्या ग्राहकांना आम्हाला पाहिल्यावर त्यांना देखील आनंद होतो, असं टाटा पॉवर मधील कर्मचारी उदय विश्वकर्मा यांनी सांगितले.

    First published:
    top videos

      Tags: Local18, Mumbai