Home /News /mumbai /

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी टाटांचा मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल कौतुक

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी टाटांचा मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल कौतुक

कोरोनाविरुद्धच्या लढाईत 1 हजार 500 कोटींच दान दिल्यानंतर टाटा समुहाने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय.

  मुंबई 03 एप्रिल : कोरोनाविरुद्धच्या लढाईत 1 हजार 500 कोटींच दान दिल्यानंतर टाटा समुहाने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. त्यांच्या ताज ग्रुपच्या मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आता कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना रुम्स मिळणार आहेत. अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वेगळं राहण्याची गरज असते. त्यामुळे समुहाने हा निर्णय घेतला आहे. कुलाब्यातलं हॉटेल ताज महल, बांद्र्यातलं ताज लँड्स, सांताक्रुजमधलं हॉटेल ताज आणि हॉटेल प्रेसिडंट या हॉटेल्समध्ये डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी या रुम्स देण्यात येणार आहेत. प्रशासन आणि सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे. मुंबईत आधीच जागेची कमतरता असते. त्यामुळे त्यांची सोय कुठे करायची याची चिंता प्रशासनाला होती. या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केलाय. त्यासाठी टाटा ट्रस्ट आणि उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी तब्बल 1 हजार 500 कोटींची मदत देणार असल्याचं जाहीर केलं आहे. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असंही रतन टाटांनी म्हटलं आहे. हे वाचा -  नरेंद्र मोदींच्या सकाळच्या व्हिडिओ मेसेजनंतर लोकांनी Google वर शोधलं Dada Kondke कोरोनाग्रस्त रुग्णांवरचे उपचार, त्यासाठीची औषधं आणि इतर सामुग्री, संशोधन अशा सगळ्याच गोष्टींसाठी या मदतीचा उपयोग करण्यात येणार असल्याचं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. या आधी राहुल बजाज यांच्यासह अनेक उद्योगपतींनी मदत जाहीर केली आहे. Coronavirus च्या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

   हे वाचा - नागपूरच्या डॉक्टरांनी बनवला सेफ्टी बॉक्स, बाधित रुग्णाकडून संक्रमणाचा धोका कमी

  त्यासाठी Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund स्थापन करण्यात आला आहे. Covid-19 च्या लढाईसाठी बळ म्हणून ज्या नागरिकांना छोट्या -मोठ्या प्रमाणावर दान करायचं आहे त्यांनी PM Cares Fund ला आपलं योगदान द्यावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Ratan tata

  पुढील बातम्या