टाटा फायनान्सच्या माजी व्यवस्थापकीय संचालकाची आत्महत्या

टाटा फायनान्सच्या माजी व्यवस्थापकीय संचालकाची आत्महत्या

'मला माफ करा, माझ्या व्यक्तिगत कारणामुळे मी आत्महत्या करत आहे'

  • Share this:

5 जुलै : टाटा फायनान्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक दिलीप पेंडसे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडलीये. दादरच्या हिंदु कॉलनीतल्या राहत्या घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केलीये.

दिलीप पेंडसे हे मुंबईतील दादर पूर्वेकडील रॉयल ग्रेस इमारतीत राहतात. याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचं कार्यालय आहे. सकाळी ते कार्यालयात आले. पण दुपारपर्यंत कुणीच बाहेर न आल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना बोलावण्यात आलं.

तेव्हा पेंडसे यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. आत्महत्येपूर्वी पेंडसेंनी सुसाईट नोट लिहिली. यात त्यांनी 'मला माफ करा, माझ्या व्यक्तिगत कारणामुळे मी आत्महत्या करत आहे' असल्याचं म्हटलंय.

या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आलीये.

First published: July 5, 2017, 11:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading