छोटा शकीलचा राईट हॅण्ड तारिक परवीनला अटक

छोटा शकीलचा राईट हॅण्ड तारिक परवीनला अटक

१९९८ च्या मुंब्रा मर्डर केसचा सूत्रधार असल्याचा आरोप तारिकवर आहे. १९९८ पासून तारिक फरार होता.

  • Share this:

 28 एप्रिल: कुख्यात गँगस्टर   छोटा शकीलचा उजवा हात समजला जाणाऱ्या तारिक परवीनला अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकानं ही कारवाई केलीये.

तारिक परवीनला अटक होणे   हा दाऊद गँगला दणका समजला जातोय. याआधीही दाऊदच्या काही हस्तकांना अटक करण्यात आली आहे. यामुळे दाऊद गँग पोलीसच्या रडारवर असल्याचं स्पष्ट झालंय.

१९९८ च्या मुंब्रा मर्डर केसचा सूत्रधार असल्याचा आरोप तारिकवर आहे. १९९८ पासून तारिक फरार होता. छोटा शकीलच्या सांगण्यावरून तारिकनं ही हत्या केल्याची सूत्रांची माहिती आहे. याच गुन्ह्यात छोटा शकीलही वॉन्टेड आहे. ही कारवाई ठाणे खंडणी विरोधी पथकानं प्रदीप शर्मा यांच्या टीमनं केलीये.याआधीही त्याला अटक करण्यात आली होती .पण पुराव्यांअभावी सोडून देण्यात आलं होतं. तसंच मुंब्रा हत्याकांडाशी त्यााच संबंध स्पष्ट नव्हता. तारिक  परवीन दाऊदची रियल इस्टेटचा बिझनेस हाताळायचा  अशीही चर्चा आहे.

आता यापुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2018 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...