सोनिया गांधींचं पत्र घेऊन काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सोनिया गांधींचं पत्र घेऊन काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रम राबवावे यासाठी पत्र पाठवले होते.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर :  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी ( MVA Government) सरकार स्थापन केले. नुकतेच या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांची नाराजी अद्यापही कायम असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia gandhi Letter) यांचे पत्र घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balashab Thorat) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांची भेट घेतली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रम राबवावे यासाठी पत्र पाठवले होते. त्यानुसार राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेते  नितीन राऊत,  वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थितीत होते. या पत्रकामध्ये दलित, आदिवासी विकास योजनेसाठी निधी देण्यात यावा, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली.

भारतीय सीमेवर पाकिस्तानचा ड्रोनहल्ला, भारतीय जवानांचं सडेतोड उत्तर

'सोनिया गांधी यांचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. आदिवासी, दलित समाजासाठी निधीची तरतूद करावी. शिक्षण आणि इतर योजना कालबद्ध कार्यक्रम करावे' अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

तसंच, 'किमान समान कार्यक्रम हा तिन्ही पक्षाचा आहे, त्यामुळे या यशाचे वाटेकरी तिघेही आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे प्राधान्याने वैद्यकीय सेवा ही पहिली भूमिका होती. पण, परिस्थिती आता आटोक्यात आली आहे' असंही थोरात म्हणाले.

पुण्यात जन्मदात्यानेच आपल्या 9 वर्षींच्या मुलीला बनवली वासनेची शिकार!

'आमची महाविकास आघाडी भक्कम आहे. भाजप हा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांचे नेते काही ही आरोप करतात. देवेंद्र फडवणीस यांचे भविष्य कायम खोटे ठरते, त्यांच्या पक्षात प्रवेश हे देखील खोटे ठरले होते. आगामी काळात  महाविकास आघाडीत आणखी लोकांचे प्रवेश होणार आहे, अशी माहितीही थोरात यांनी दिली.

'भाई जगताप हे अॅग्रिसिव्ह नेते आहे.  दमदार टीम मुंबईत तयार करता येईल. शेवटी पूर्ण मुंबई काम करायचे आहे.  227 जागांवर तयारी करावी लागणार आहे. पुढे बघता येईल की आघाडी करायची की नाही. पण आमचा एक नंबर शत्रू भाजप आहे' असंही थोरात म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: December 21, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या