ओला उबर वापरताना 'ही' काळजी घ्या

ओला उबर वापरताना 'ही' काळजी घ्या

पण ज्या ओलामध्ये या तरूणीवर बलात्कार झाला त्या ओलाचं तिने ऑनलाईन बुकिंग केलं नव्हतं तर हात दाखवून गाडी थांबवली होती असा ओला कंपनीचा दावा आहे.

  • Share this:

24 डिसेंबर: नुकतंच एका तरूणीवर बलात्कार ओलामध्ये बलात्कार झाल्यामुळे सगळेच हादरून गेले आहेत. ओला उबेर वापरवं की नाही यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

पण ज्या ओलामध्ये या तरूणीवर बलात्कार झाला त्या ओलाचं तिने ऑनलाईन बुकिंग केलं नव्हतं तर हात दाखवून गाडी थांबवली होती असा ओला कंपनीचा दावा आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेसाठी ओला आणि उबर वापरताना थोडी काळजी नक्कीच घ्यायला हवी.

 

ओला, उबरची सेवा वापरताना ही काळजी घ्या

- शक्य झाल्यास प्रवासात झोपू नका, चालक आणि मार्गावर लक्ष ठेवा

- चालकाची वागणूक थोडी जरी संशयास्पद वाटली, तर गाडी थांबवा

- 'पूल' पर्याय निवडला असेल तर सह-प्रवाशांवरही लक्ष ठेवा

- ओला, उबर अॅपमध्ये 'इमर्जन्सी' पर्याय असतो, त्याबाबत जाणून घ्या

- हात दाखवून गाडी थांबवू नका, अॅपमार्फतच गाडी बुक करा.

- खासगी वाहनं स्वस्तात नेतात पण त्यात सुरक्षेची हमी नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2017 04:12 PM IST

ताज्या बातम्या