मुंबई, 29 सप्टेंबर : स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना गुन्हा पाठिशी घालणाऱ्यांना दर मिनिटाला खोटं बोलावं लागतंय, एकाच वेळी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात...ही 'मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची' (Multiple personality disorders)चीच लक्षणं आहेत. हा आजार अतिशय भयानक आहे. चित्रा वाघने वेळीच तपासणी करून तब्येतीची काळजी घ्यावी, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (NCP Rupali Chakankar) यांनी केली आहे.
भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या ऑडियो क्लिप प्रकरणी चित्रा वाघ मौन बाळगून होत्या. तीच संधी साधत रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. (Symptoms of Multiple Personality Disorder in Chitra Wagh Strong discussion due to Rupali Chakankars statement)
हे ही वाचा-"शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढू, धीर सोडू नका" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
चित्रा वाघ यांना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणं; राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा pic.twitter.com/IMGv2KLRRv
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2021
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आज माध्यमांशी बोलताना भाजपवर हल्ला केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कोरोना (Corona Virus in India) हा आजार मानवनिर्मित असून तो भारतात आणला गेला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. त्याचसोबत कोरोना काळात अमित शहा यांच्या मुलाचा नफा नऊ हजार पट वाढला होता, त्यासाठी अमित शहा यांच्याकडे कोणती जादूची कांडी आहे का? असा प्रश्न करत ती कांडी देशातील बेरोजगार तरुणांना द्यावी, ज्याचा देशातील बेरोजगारांनाही फायदा होईल असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला गॅस योजनेवरही त्यांनी जोरदार टीका करत महिलांनी मतदान करण्यासाठी जाताना घरातील गॅस बघून जावा असे वक्तव्य त्यांनी केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chitra wagh, NCP