03 मे : मुंबईतील तापमानात होणाऱ्या चढ-उतारामुळे स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजाराचा धोका वाढत आहे. स्वाईन फ्लूने मुंबईत आज पहिला बळी घेतला आहे. भायखळ्याच्या दाऊद हॉस्पिटलमध्ये एका 18 महिन्यांच्या चिमुरड्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मुंबईत स्वाईन फ्लूचे केवळ 3 रुग्ण आढळले होते. यांपैकी सर्वजण बरेही झाले होते. मात्र यावर्षी जानेवारी ते 30 एप्रिल या चार महिन्यांत मुंबईत 21 रुग्ण आढळले, तर त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
2011 नंतर यावर्षी देखील राज्यात स्वाईन फ्लूचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यभरात 1 जानेवारीपासून आतापर्यंत या आजारामुळे 165 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 844 रुग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा