मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

काँग्रेसवर गंभीर आरोप करत सावरकरांच्या नातवाने उद्धव ठाकरेंकडे केली कारवाईची मागणी

काँग्रेसवर गंभीर आरोप करत सावरकरांच्या नातवाने उद्धव ठाकरेंकडे केली कारवाईची मागणी

देशभर अराजकता माजविण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचले आहे असा गंभीर आरोप रणजित सावरकर यांनी केला आहे.

देशभर अराजकता माजविण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचले आहे असा गंभीर आरोप रणजित सावरकर यांनी केला आहे.

देशभर अराजकता माजविण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचले आहे असा गंभीर आरोप रणजित सावरकर यांनी केला आहे.

  • Published by:  Akshay Shitole

विवेक कुलकर्णी, 3 जानेवारी : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत सुरू असलेला वाद आता आणखीनच चिघळला आहे. सावरकरांवर बिनबुडाचे आरोप करून देशभर अराजकता माजविण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचले आहे असा गंभीर आरोप स्वातंत्र्यवीर सावकर यांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला आहे.

मध्यप्रदेशमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी पुस्तिका सेवा दलाच्या सदस्यांना वाटून काँग्रेसने पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान केला आहे. याची गंभीर दाखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी रणजित सावरकर यांनी केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे, त्यामुळे भारतीय दंड संहिता 120, 500, 503 504 , 505, 506 याअंतर्गत राष्ट्रीय पुरुषांचा अपमान करणे आणि समाजात अराजकता माजवणे, यासाठी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे.

पालकमंत्री आणि खातेवाटपाची यादी तयार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल करण्यात आलेल्या आक्षेपांना वारंवार उत्तरे देण्यात आली असून त्यांचे खंडन देखील अनेकदा केले गेले आहे. असे असतानाही त्यांच्याविषयी बदनामी करणारी पुस्तिका प्रकाशित करण्याच्या खोडसाळपणाचा निषेध करत मध्य प्रदेश सरकारने तत्काळ बंदी घालावी आणि ती मागे घेण्यात यावी असेही रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.

या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर यांच्या विषयी घेण्यात आलेले आक्षेप म्हणजे शिळ्या कढीला ऊत देण्यासारखा प्रकार आहे. त्यात नमूद केलेले मुद्दे हे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या चर्चांमध्ये वारंवार कसे चुकीचे आहेत हे सिद्ध केले गेले आहेत. त्याला कसलेही प्रमाण नसताना या आरोपांचे पुनर्मुद्रण करणे केवळ नैतिकतेला धरून नाही तर जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षड्यंत्र व मोठे कटकारस्थान ह्यामागे असल्याचा संशय देखील रणजित सावरकर यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेवर बंदी घातली गेली नाही तर मात्र कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा देखील रणजित सावरकर यांनी दिला आहे.

First published:

Tags: Congress, Swatantryaveer savarkar, Uddhav thackeray