Home /News /mumbai /

स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद, MPSC परीक्षेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद, MPSC परीक्षेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवार यांनी निवेदन सादर केल्यानंतरही भाजपच्या आमदारांकडून गोंधळ सुरूच होता.

  मुंबई, 05 जुलै : स्वप्निल लोणकर आत्महत्या (swapnil lonkar suicide case) प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात ( monsoon season maharashtra)  पडले. भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी MPSC च्या 31 जुलै पर्यंतच्या सर्व जागा भरणार असल्याची घोषणा केली. पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे. MPSC परीक्षेच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला. देवेंद्र फडणवीस यांनी MPSC परीक्षेच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  पुण्यात साऊथ फिल्मचा थरार; टोळक्यानं काठी, तलवारीनं वार करत दोघांना दगडानं ठेचलं

  अजित पवार यांनी निवेदन सादर केले. स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना होती. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आपण सर्वांना त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. MPSC च्या ज्या जागा रिक्त आहे. त्या जागा 31 जुलैपर्यंत भरून काढण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

  तिसऱ्या समन्सनंतर अनिल देशमुखांचं ईडीला उत्तर, म्हणाले...

  अजित पवार यांनी निवेदन सादर केल्यानंतरही भाजपच्या आमदारांकडून गोंधळ सुरूच होता. स्वप्निलच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत द्यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या