Home /News /mumbai /

पहाटे 4 पर्यंत गार्डसोबत गप्पा अन् अचानक स्वदिच्छा गायब, 20 दिवस उलटले पण...

पहाटे 4 पर्यंत गार्डसोबत गप्पा अन् अचानक स्वदिच्छा गायब, 20 दिवस उलटले पण...

शाहरुख खानच्या बंगल्या बाहेरील समुद्र किना-यांवर शेवटची स्वदिच्छाला पाहिले गेले होते… यांवर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांचा स्पेशल रिपोर्ट…

  मुंबई, 17  डिसेंबर : मुंबई पोलिसांसमोर (mumbai) सध्या एक मोठे आवाहन उभं ठाकलं आहे. एक तरुण मुलगी मुंबईतून रहस्यमयरित्या गायब झाली आहे. तिचा शोध घेण्याकरता मुंबई पोलीस दिवस रात्र एक करत आहेत मात्र त्या तरुणीचा काहीच थांग पत्ता लागत नाही. स्वदिच्छा साने (Swadichcha Sane) असं या तरुणीचे नाव असून पालघर (palghar) जिल्ह्यातील बोईसर येथून ती MBBS च्या परीक्षेकरता मुंबईत आली होती पण आजपर्यंत ती कुठे गेली हे कोणालाच ठाऊक नाही. पालघर, मुंबई, ठाणे या सर्व शहरात स्वादिच्छा साने या तरुणीचा शोध घेतला जात आहे. स्वदिच्छा ही MBBS ची विद्यार्थीनी असून 29 नोव्हेंबरच्या दिवशी मुंबईत MBBS च्या परीक्षेकरता बांद्रा येथे गेली होती. ती आजतगायत परत आली नाही.  स्वदिच्छा साने हिचे वडील मनीष साने हे पेशाने पत्रकार असून त्यांची मुलगी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. स्वदिच्छा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. स्वतःच्या हिमतीवर अभ्यास करत ती एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. या दरम्यान तिला अनेक पारितोषिके देखील मिळाली आहेत. घरात नजर जाईल तिथे स्वादिच्छाने मिळवलेले यश पहायला मिळते. स्वादिच्छाचे ही पारितोषिके पाहून अभिमान वाटत होता पण आता हिच पारितोषिके पाहून तिच्या वडिलांना अश्रू अनावर होत आहे. सरकारी नोकरीसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून 'विशेष' गिफ्ट 29 नोव्हेंबर या दिवशी स्वदिच्छा मुंबईतील गेली ती अजूनही परत आली नाही. पण या दरम्यान स्वदिच्छाचे शेवटची दिसली ती बांद्रा येथील शाहरुख खानच्या बंगल्या समोरील समुद्रावर.  याच समुद्रावर स्वदिच्छा मितू सिंग नावाच्या एका लाईफ गार्डसोबत २९ तारखेच्या रात्री १२.३० ते पहाटे ४ पर्यंत गप्पा मारत बसली होती आणि त्यांनतर स्वदिच्छा कुठेच दिसली नाही. स्वदिच्छाने या लाईफगार्ड सोबत गप्पा मारल्या होत्या ही माहिती स्वतः त्या लाईफ गार्डने पोलिसांना सांगितली एवढंच नाहीतर त्याने त्या रात्री स्वदिच्छा सोबत सेल्फी देखील काढले होते ते ही त्याने पोलिसांना दिले. ज्यामुळे स्वदिच्छाच्या कुटुंबीयांना मितू सिंग वरच संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी मितूची चांगलीच चौकशी केली पण काहीच हाती न लागल्याने पोलिसांनी मितूला सोडून दिले. पण प्रश्न अजून तोच आहे. स्वदिच्छा आहे कुठे, ज्याचे उत्तर १८ दिवस झाले तरी कोणालाच मिळाले नाही. स्वदिच्छा MBBS च्या परीक्षेला गेलीच नाही? दरम्यान, स्वदिच्छा 29 तारखेच्या आधी कुठे कुठे गेली होती? तीने कोणा कोणाला फोन केले होते? तिच्या संपर्कात कोण होते? या सर्वची माहिती काढली. यांत आता मुंबई क्राईम ब्रांच देखील तपास करत असून मुंबई पोलीस दलातील अनेक वरीष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात तपास करत आहेत. या पोलीस तपासा दरम्यान काही धक्कादायक खुलासे झाले.

  राज्याचे पोलीस महासंचालक बदलणार? गृहमंत्र्यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

  परीक्षेला जाते असं सांगून 29 तारखेला स्वदिच्छाने घरच्यांना फोन केला होता तर रेल्वे प्रवासादरम्यान आपण चुकीच्या रेल्वे स्थानकावर उतरलोय हे देखील स्वदिच्छाने घरच्यांना फोन करुन सांगितले होते. पण धक्कादायक म्हणजे ती त्या दिवशी परीक्षेला गेलीच नव्हती हे आता पोलिस तपासात उघड झालंय. स्वदिच्छाचे इन्स्टाग्राम अकाऊंट कोण ओपरेट करतय? २९ नोव्हेंबर या तारखेपासून मध्यरात्रीपासून MBBS ची विद्यार्थिनी स्वदिच्छा बेपत्ता आहे, असं असलं तरी एक गोष्ट सतत पोलिसांना, तिच्या कुटुंबीयांना आणि तिला शेवटी भेटलेला बीच वरील लाईफ गार्ड मितू याला पडला आहे. जर स्वदिच्छा बेपत्ता आणि तिझा मोबाईल बंद आहे तर मग तिचे इन्स्टाग्रामवरील अकाऊंट ॲापरेट कोण करत आहे?
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Mumbai

  पुढील बातम्या