Home /News /mumbai /

आतापर्यंत एसटीच्या 2053 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन; पुण्यातील आकडा सर्वाधिक

आतापर्यंत एसटीच्या 2053 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन; पुण्यातील आकडा सर्वाधिक

संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाईची एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST employees Strike) अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असतानाही संप सुरूच आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र कायद्याने हे शक्य नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांकडे काही अवधीही मागितला आहे. मात्र एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हे ही वाचा-'एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात...' म्हणत मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन त्यातही संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाईची एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय करून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार असं चित्र आहे. पुण्यातून 138 कर्मचाऱ्यांचा निलंबन करण्यात आलं असून त्यानंतर ठाण्यातून 73 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे. सर्व कर्मचारी आपलेच असून कोरोना काळातून राज्य सावरत असताना सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभिर्यानं विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pune, St bus

    पुढील बातम्या