छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सचिन वाझेंना चार ते पाच वेळा एकाच ठिकाणी चालवण्यात आलं. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चाल ओळखण्यासाठी सचिन वाझेंना त्याच जागी आणण्यात आलं आणि चालण्यास सांगितलं. NIA च्या गाड्या थेट वाझेंना घेऊन सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मवर पोहोचल्या. त्यावेळी लोकलच्या बाजूने वाझेना चालवलण्यात आले, त्यांना काही प्रश्न विचारण्यात आल्याचेही व्हिडीओतून समजत आहे. (हे वाचा-पवारांचे स्वीय सहाय्यक ते राज्याचे गृहमंत्री; वळसे पाटलांचा प्रवास) मुंबईत गाडीमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी सीएसएमटी स्थानकात नेण्यात आले होते. यावेळी एनआयए टीमसोबत पुणे याठिकाणच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची टीमही हजर होती.#WATCH | Mumbai: Suspended Mumbai Police Officer Sachin Waze being taken from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT)
Officials from Pune's Central Forensic Science Laboratory (CFSL) also seen leaving. They were also present at CSMT when Waze was brought here sometime back. pic.twitter.com/qoCDUGHuwJ — ANI (@ANI) April 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.