'लष्कर-ए-तोयबा'च्या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक

'लष्कर-ए-तोयबा'च्या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक

"सैन्यात हेरगिरी करण्यासाठी आफताबला सलीमनं पैसा पुरवला होता"

  • Share this:

17 जुलै : मुंबई विमानतळावर लष्कर ए तोयबाच्या संशयित दहशतवाद्या एटीएसने अटक केलीये.  सलीम खान असं या दहशतवाद्याचं नाव आहे.

यूपी एटीएसने मुंबई विमानतळावर सलीम खान नावाच्या व्यक्तीला अटक केलीये. सलीम खान हा यूपीच्या फतेहपुरच्य़ा हाथगावचा राहणारा आहे. फैजाबादहुन पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंटचा तो फायनासर होता.  सैन्यात हेरगिरी करण्यासाठी आफताबला सलीमनं पैसा पुरवला होता. एवढंच नाहीतर लष्कर ए तोयबाच्या मुजफ्फराबादच्या कॅम्पमध्ये सलीमनं ट्रेनिंगही घेतलं असल्याची माहिती समोर आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 06:04 PM IST

ताज्या बातम्या