Home /News /mumbai /

मोठी अपडेट : सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडच्या 2 मोठ्या अभिनेत्यांची चौकशी होण्याची शक्यता

मोठी अपडेट : सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडच्या 2 मोठ्या अभिनेत्यांची चौकशी होण्याची शक्यता

आत्महत्येमागील नेमकं कारण काय, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या गोटातून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

मुंबई, 19 जून : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर दिवसागणित मोठ्या आरोपांची राळ उठली आहे. अभिनेत्री कंगना राणौत हिच्यासहित अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधील दिग्गज सुशांतच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या आत्महत्येमागील नेमकं कारण काय, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या गोटातून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात दिवसागणिक नवी माहिती समोर येत आहे. या आत्महत्येप्रकरणी आता बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. चौकशी होण्याची शक्यता असलेले हे दोन्ही स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या करिअरशी संबंधित असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेत्यांसोबतच 3 प्रॉडक्शन प्रमुखांची देखील चौकशी होणार आहे. बॉलिवूडमधील काही बॅक स्टेज कलाकारही चौकशी यादीत आहेत. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील चौकशीसाठी 3 विशेष टीम तयार करण्यात आल्या आहेत. सोनू निगमनेही केला गंभीर आरोप सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहरे समोर येत बोलू लागले आहेत. अशातच सोनू निगम यानेही एक खळबळजनक दावा केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील एका बाड्या कंपनीमुळे अनेक गायक आत्महत्येचा पर्याय स्वीकारू शकतात, असं सोनू निगमने म्हटलं आहे. कंगनाचा पुन्हा धक्कादायक खुलासा याआधी अभिनेत्री कंगना रणौतनं सुशांतच्या आत्महत्येनंतर एक व्हिडीओ पोस्ट करत बॉलिवूडवर आरोप केले होते. आता कंगनानं एक धक्कादायक खुलासा केला आहे. कंगनानं सुशांतसोबत जे काही घडलं ते आपल्यासोबतही याआधी घडल्याचं सांगितलं आहे. कंगना म्हणाली की, "पहिल्यांदा आणि अखेरचं जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं. तेव्हा त्यांनी समजावलं आणि सांगितलं की, जर मी राकेश रोशन यांची माफी नाही मागितली तर मला मोठं नुकसान सहन करावं लागले. एवढेच नाही तर, जावेद अख्तर यांनी कंगनाला संपूर्ण रोशन कुटुंबाची माफी मागण्यास सांगितले होती, असेही अभिनेत्रीनं सांगितलं. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Bollywood, Sushant sing rajput

पुढील बातम्या