सुशांतप्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची CBI चौकशी करा, भाजप नेत्याने थेट अमित शहांकडे केली मागणी

सुशांतप्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची CBI चौकशी करा, भाजप नेत्याने थेट अमित शहांकडे केली मागणी

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणातील तपासामुळे महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. काँग्रेसने भाजपवर आरोप केल्यानंतर आता भाजपने पलटवार करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे.

'सुशांत मृत्यू प्रकरणात बॉलीवूड, ड्रग्स आणि राजकारणी यांचे संबंध रोज उघड होत आहेत. हे संबंध दडपण्याचा राज्य सरकारमधील गृह विभागातील कोणत्या शक्तीने प्रयत्न केला? बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बोलवा किंवा बोलवू नये, तसंच त्याचं कसं स्टेटमेंट घ्यावं अशा सूचना देणारा मंत्री कोण? या सगळ्या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी,' अशी मागणी अतुल भातखळकर यांनी अमित शाह यांना पत्र लिहून केली आहे.

गृहमंत्र्यांनी केला होता भाजपला घेरण्याचा प्रयत्न

चित्रपट निर्माता आणि सुशांतचा मित्र संदीप सिंह याचे भाजपशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याप्रकरणी लक्ष घातलं आहे.

'संदीप सिंह यांचा बिजेपीशी काय संबंध आहे, ड्रग माफियांशी काय संबंध आहे... या संदर्भात निवेदन आलं आहे. ते निवेदन आम्ही सीबीआयकडे सोपवलं आहे. आज आणि काल मला अनेक निवेदने मिळाली आहेत,' असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 30, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या