धक्कादायक! सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी दीड लाख fake अकाउंट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात सुरुवातीला मुंबई पोलीस (mumbai police) तपास करत होते, त्यावेळी सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात सुरुवातीला मुंबई पोलीस (mumbai police) तपास करत होते, त्यावेळी सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या.

  • Share this:
    अजित मांढरे/मुंबई, 03 नोव्हेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांची (mumbai police) भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात होता. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात होते. सोशल मीडियावर (social media) मुंबई पोलिसांना टार्गेट केलं जात होतं. मात्र आता या प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर फेक अकाऊंट ओपन केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर BOTS चा वापर केला गेला होता. सोशल मीडियावर दीड लाखांहून अधिक बनावट अकाऊंट तयार करण्यात आले, असा धक्कादायक खुलासा मुंबई पोलिसांनी केला होता. 14 जूनला सुशांत सिंहचा मृतदेह वांद्र्यातील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. यानंतर सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यावेळी या प्रकरणात  ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. #JusticeForSSR, #SushantConspiracyExposed, #justiceforsushant, #sushantsinghrajput #SSR  असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते. सोशल मीडियावरील बहुतेक अकाऊंट फेक होती, असा खुलासा मुंबई सायबर पोलिसांनी केला आहे. हे वाचा - SSR case : सुशांत का गेला डिप्रेशनमध्ये? मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. या बनावट खातेधारकांवर आयटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर सेल युनिट या प्रकरणातचा सखोल तपास करणार आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांचा मुंबई हायकोर्टात मोठा खुलासा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आता वेगळाच ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. सुशांतच्या बहिणी मीतू सिंह आणि प्रियांका सिंह यांच्याविरुद्ध तक्रारीप्रमाणेच एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ने सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच आधारे त्यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे. असं प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. हे वाचा - कोहली, गांगुली, राणा, तमन्नाला कोर्टाची नोटीस; online gaming apps मुळे अडचणीत रियाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सुशांतच्या बहिणींवर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीने तक्रार केली आहे की, सुशांतच्या बहिणीने दिल्लीच्या एका डॉक्टरकडून बोगस प्रिस्क्रिप्शन सुशांतसाठी पाठवलं होतं. सुशांतच्या मन:शांतीसाठी ही औषधं पाठवली आहेत अशी बतावणी करुन काही औषधं पाठवण्यात आली होती. पण या औषधांमुळे सुशांतची मानसिक अवस्था बिघडली असा आरोप रियाने केला आहे. ही औषधं घेतल्यामुळेच सुशांतने आत्महत्या केली असावी असा संशय रियाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख आहे.
    Published by:Priya Lad
    First published: