मुंबई पोलीस कोणत्या बड्या नेत्यांना वाचवत आहेत? सुशांत प्रकरणावरून भाजप नेत्याचा खोचक सवाल

मुंबई पोलीस कोणत्या बड्या नेत्यांना वाचवत आहेत? सुशांत प्रकरणावरून भाजप नेत्याचा खोचक सवाल

एकीकडे सुशांत सिंह रजपूतची आत्महत्या झाल्याचं एम्सच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून तपासाची चक्र आता ड्रग्सकडे वळली आणि याचे पडसाद राजकारणातही पाहायला मिळाले आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून आता भाजप आमदाराने शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर ट्वीटकरून निशाणा साधला आहे. सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास वळवून ड्रग्स कनेक्शनवर आणला आणि त्यातही ड्रग्सबाबत मिळालेल्या दुव्याकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष का केलं? मुंबई पोलिसांना काही बड्या नेत्यांना वाचवायचं होतं का? बॉलिवूडमधील ड्रग्जचा व्यवसाय वाढतोय याची जबाबदारी सरकारनं घ्यायला हवी. अशा गोष्टी होतात याची सगळ्यात पहिली माहिती ही सरकारला असायला हवी. अशा प्रकारे ट्वीट करून निशाणा साधला आहे.

हे वाचा-काँग्रेसचे संकटमोचक अडचणीत, डीके शिवकुमार यांच्या 15 ठिकाणांवर CBI चे छापे

शिवसेनेकडून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न?

दुसर्‍या ट्वीटमध्ये भाजपच्या आमदारानेही शिवसेना नेत्यांना हिंदू धर्म आणि त्यांच्या अजेंडावरून शिवसेनेवर सवाल उपस्थित केला आहे. शिवसेना नेत्यांना हिंदू धर्माचा विसर पडला आहे. सीबीआय चौकशी पूर्ण होण्यापूर्वी त्यांना निष्कर्ष माहिती असतात. शिवसेनेला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा खोचक टोलाही भाजप नेत्यानं लगावला आहे.

एकीकडे सुशांत सिंह रजपूतची आत्महत्या झाल्याचं एम्सच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर दुसरीकडे सुशांतचा मृत्यू आणि ड्रग्स कनेक्शन यामुळे भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्यानं पुन्हा एकदा ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 1:11 PM IST

ताज्या बातम्या