मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सुशांतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण? राष्ट्रवादीचा CBI ला थेट सवाल

सुशांतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण? राष्ट्रवादीचा CBI ला थेट सवाल

'भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते'

'भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते'

'भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते'

मुंबई, 14 जून:  सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावर (sushant singh rajput case) भाजपला (BJP) बिहार निवडणूक (Bihar Election) लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला (MVA Government) बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आलं होतं' असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, 'सुशांत सिंगची आत्महत्या नव्हती तर मग हत्यारा कोण हे सीबीआयने (CBI) सांगावे' असा सवालही नवाब मलिकांनी (Nawab Malik) उपस्थितीत केला.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला (sushant singh rajput death anniversary) आज वर्ष पूर्ण झाले आहे. सुशांतच्या आत्महत्येवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर बेछुट आरोप केले होते. एवढंच नाहीतर सीबीआय चौकशीची मागणीही केली होती. पण, वर्षभराच्या तपासानंतर या प्रकरणी सीबीआयच्या हाती काहीच लागले नाही. याच मुद्यावरून नवाब मलिक यांनी भाजप आणि सीबीआयवर निशाणा साधला आहे.

ड्रग्ज प्रकरणी झाली होती अटक; बाहेर पडताच अभिनेत्रीनं केलं BOLD फोटोशूट

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते असा थेट आरोप  नवाब मलिक यांनी केला आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला आणि ही केस सीबीआयकडे दिली होती, परंतु निष्पन्न काय झालं? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

एक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

First published:
top videos