SSR Death Case: बिहार पोलिसांना रिकाम्या हाताने जावं लागणार, कागदपत्र द्यायला सरकारचा नकार

SSR Death Case: बिहार पोलिसांना रिकाम्या हाताने जावं लागणार, कागदपत्र द्यायला सरकारचा नकार

नियमानुसार या प्रकरणात बिहार पोलिसांना चौकशी करण्याचा अधिकारच नाही असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे.

  • Share this:

मुंबई 3 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी मुंबईत चौकशी करणाऱ्या बिहार पोलिसांना कागदपत्र देणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकरणी सरकारने ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेतला होता. त्यानंतर बिहार पोलिसांना हा नकार कळविण्यात आला आहे. त्यामुळे आता बिहार पोलीस कुठलं पाऊल उचलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नियमानुसार  या प्रकरणात बिहार पोलिसांना चौकशी करण्याचा अधिकारच नाही असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. जर बिहार पोलिसांकडे तक्रार आली असल्यास ती त्यांनी मुंबई पोलिसांना द्यायला पाहिजे असं मत ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केलं होतं. हा सल्ला आल्यानंतर राज्य सरकारने बिहारला आपला नकार कळवला आहे.

मुंबई पोलीस प्रकरणाची योग्य चौकशी करत आहे. त्यामुळे हे प्रकरणी इतर कुणाहीकडे चौकशीसाठी देणार नाही असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना (Bihar police) मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कारण मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमला कोणतंही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बिहार पोलिसांवर रिक्षाने फिरण्याची वेळ आली.

VIDEO : '25 फेब्रुवारीला सुशांतच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसात केली होती तक्रार'

बिहारच्या IPS अधिकाऱ्याला होम क्वारंटाईन केल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या आयुक्तालयासमोर भाजपने आंदोलन केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेट दिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

VIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं? पोलीस आयुक्तांची माहिती

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहार पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असं चित्र रंगवण्यात येत आहे. त्यात सुशांत प्रकरणाची चौकशी करायला मुंबईत पोहोचलेल्या IPS अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने होम क्वारंटाईचा शिक्का मारून घराबाहेर पडण्यास बंदी घातली गेल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 3, 2020, 8:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या