VIDEO : हे खरं की ते खरं? मुंबईच्या सुशांत राणेची भन्नाट 3 D चित्रकला

VIDEO : हे खरं की ते खरं? मुंबईच्या सुशांत राणेची भन्नाट 3 D चित्रकला

मुंबईच्या सुशांत राणेने स्वत:हूनच इंटरनेटवर बघतबघत 3 D चित्रकला शिकून घेतली आणि एक महिन्यात तो 3 D आर्टचा मास्टर झाला. त्याने काढलेली चित्रं पाहिली की त्या चित्रातल्या वस्तू किंवा एखादा प्राणी खऱे आहेत की खोटे असा प्रश्न आपल्याला पडतो.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : आपण भेटणार आहोत, अशा एका कलाकाराला की ज्याला मुंबईतल्या नामांकित आर्ट इन्स्टिट्यूटने 3 वेळा अ‍ॅडमिशन नाकारली होती पण आता याच कलाकाराच्या 3 D चित्रांची चर्चा जगभरात आहे.

मुंबईच्या सुशांत राणेने स्वत:हूनच इंटरनेटवर बघतबघत 3 D चित्रकला शिकून घेतली आणि एक महिन्यात तो 3 D आर्टचा मास्टर झाला. त्याने काढलेली चित्रं पाहिली की त्या चित्रातल्या वस्तू किंवा एखादा प्राणी खऱे आहेत की खोटे असा प्रश्न आपल्याला पडतो. 2 D आर्टमध्ये X आणि Y अक्षावर चित्रं काढलेली असतात. त्यामुळे ती सपाट दिसतात. पण 3 D चित्रं त्या पानांतून बाहेर येतायत, असा भास होतो. अशी चित्रं X Y आणि Z अक्षावर काढली जातात. ही सगळी जादू सुशांतच्या बोटांची आहे.

अशी चित्रं काढणाऱ्या या अवलिया कलाकाराची दखल आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली आहे.सुशांत राणे हा मार्कर, कलर पेन्सिल आणि वॉटर कलरचं माध्यम वापरून अशी चित्रं काढतो. हायलाइट्स आणि शॅडोजच्या त्याच्या तंत्रामुळे ही चित्रं आहेत की आपण एखादी वस्तू प्रत्यक्ष पाहतोय तेच कळत नाही आणि भलेभलेही फसतात. सुशांतच्या चित्रांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हालाही त्या चित्रातली वस्तू उचलण्याचा मोह होईल.

या तरुण कलाकाराबदद्ल म्हणूनच तर जगभरात सगळीकडे उत्सुकता आहे. ही जगप्रसिद्ध कलाकारी तो स्वत:च शिकला आहे हेही विशेषच आहे. तरुण कलाकारांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी, अशा दर्जाचं काम तो करतो आहे.

हार्दिकने खरेदी केली धोनी-कोहलीपेक्षा महाग गाडी;किमत आणि मायलेज पाहून बसेल धक्का

====================================================================================================

SPECIAL REPORT:...आणि शेतात उतरलं विमान, काय घडलं नेमकं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 08:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading