Home /News /mumbai /

सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे तोंडावर आपटले, सेनेचा सणसणीत टोला

सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे तोंडावर आपटले, सेनेचा सणसणीत टोला

'मुंबई पोलिसांनी सुद्धा सुशांतने आत्महत्या केली असा तपास केला होता. पण, यावरून भाजपने राजकारण केले.'

    मुंबई, 03 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आज पडदा पडला आहे. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली, असं शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले आहे, अशी प्रतिक्रिया सेनेच्या आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. एम्स हॉस्पिटलने आपल्या अहवालात खुलासा केल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नाही तर हत्या केली, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला होता. बिहार पोलिसांनीही सुशांतने हत्या केल्याचा दावा केला होता. सुशांतने आत्महत्या केली हे आता स्पष्ट झाले आहे. एम्स हॉस्पिटलने दिलेल्या रिपोर्टमुळे सर्वजण हे तोंडघशी पडले आहे, अशी टीका सरनाईक यांनी भाजपवर केली. 'मुंबई पोलिसांनी सुद्धा सुशांतने आत्महत्या केली असा तपास केला होता. पण, यावरून भाजपने राजकारण केले. ज्या मुंबई पोलिसांनी 26-11 सारख्या दहशतवादी हल्यात प्राणाची बाजी लावली, त्या प्रकरणाचा तपास केला. कोरोनाच्या काळात कर्तृव्य पार पाडले अशा पोलिसांवर भाजप नेत्यांनी आरोप केले होते, आता हे सर्व नेते तोंडावर आपटले आहे', असा सणसणीत टोलाही सरनाईक यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. 'सत्य कधीच बदललं जाऊ शकत नाही' दरम्यान, ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी एम्स हॉस्पिटलच्या रिपोर्टवर समाधान व्यक्त केले आहे. 'सत्य कोणत्याही परिस्थितीमध्ये बदललं जाऊ शकत नाही. रिया चक्रवर्तीच्या वतीने आम्ही कायम सांगत आलोय. पण काही माध्यमांमध्ये रियाबाबतच्या बातम्या विशिष्ट हेतूने पेरल्या जात आहेत. मात्र, आमचा सत्यावर विश्वास आहे. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया , रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली. काय आहे एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा रिपोर्ट? सुशांत प्रकरणात  दिल्लीतील​ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता. पण AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला.  सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या